कडेगांव पोलिसांनी कडेगांव तालुक्यातल्या सीमा केलेल्या सील

Google search engine
Google search engine

सांगली/कडेगांव न्युज:

कडेगांव तालुक्यातील
येतगाव येथील एकास कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल कराड येथे आला.त्याला कराड येथिल कृष्णा हाॅस्पिटल येथे आयसोलेशनमध्ये दाखल करण्यात आले आहे.तर अनेक जण कराड तालुक्यात नोकरीच्या निमित्ताने जात आहेत.यातील बहुतांश वेगवेगळ्या दवाखान्यात काम करीत आहेत. यामुळे कडेगाव पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विपिन हसबनिस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर जाधव,संदीप साळुंखे व सहकारी पोलिस यांनी जनतेसाठी खबरदारी म्हणुन येतगांव,खेराडे वांगी गावातही चोख पोलिस बंदोबस्त लावुन नाकाबंदी केली आहे.वहानधारकाकडे योग्य परवाने असतील तरच सोडले जाईल. केवळ आप्तकालिन परीस्थितीसाठी दोनच रस्ते सुरु आहेत.
याबाबतीत कडेगांव पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विपिन हसबनिस म्हणाले की येतगाव येथील एकजण कराड येथील कृष्णा हाँस्पीटल येथे सिव्हिल विभागात काम करीत होता. त्यास कोरोनाची लागण झाली. त्यांनी प्राथमिक उपचार कडेगाव तालुक्यात घेतले होते. अनेकांच्या संपर्कात आला होता.त्यामुळे कडेगाव तालुक्यात भितीचे वातावरण आहे.तसेच कृष्णा हाँस्पीटल येथे कडेगाव शहर व तालुक्यातील अनेकजण खाजगी दवाखान्यात कामाला जात आहेत.त्यांच्याकडे योग्य परवाने असतील तरच सोडले जाईल अन्यथा गुन्हे दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगीतलेआहे. खंबाळे औंध येथे कडेगांव पोलिसांनी कडक नाकाबंदी ची अंमलबजावणी केल्याने लोक शामगाव खिंडीतून मोठ्या प्रमाणावर कडेगाव तालुक्यात येत आहेत.त्यामुळे बोंबाळेवाडी तसेच करांडेवाडी येथून कराड तालुक्यातून येणारे रस्ते पुर्णपणे जे.सी.बी मशिनद्वारे चर काढून बंद करण्यात आले आहेत.
एकंदरीत कराड तालुक्यातून कडेगाव तालुक्यात येणारे मुख्य व सर्व रस्ते कडेगाव पोलिसांनी आज पुर्णपणे सील केलेआहेत. केवळ गुहागर ते पंढरपूर व मल्हारपेठ ते पंढरपूर हे दोन्ही मार्ग सुरू ठेवले आहेत.कडेगाव ते कराड सर्व सिमा सील केलेल्या आहेत.