हिंदुत्वनिष्ठ प्रखर वक्ता आणि अनेक निराधारांचा आधार असलेल्या अपर्णाताई रामतीर्थकार यांना देवाज्ञा!

0
1387
Google search engine
Google search engine

सोलापूर ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय अरुण रामतीर्थकर यांच्या पत्नी समाजसेविका अपर्णा रामतीर्थकर यांचे मंगळवारी दुपारी पावणे बाराच्या दरम्यान सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये निधन झाले .गेल्या महिन्यात गुढीपाडव्यादिवशी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता .त्यावेळेस पासून त्या सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या.मात्र आज पावणेबारा वाजता त्यांचे निधन झाले .त्यांच्या पश्चात आई ,तसेच मुलगा आशुतोष, सून रश्मी आणि नातू असा परिवार आहे.