अखेर चांदूर मधील शिवभोजन थाळीचा कंत्राट ‘कॅन्सल” – जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काढले आदेश

0
1121
Google search engine
Google search engine

मिडीयाच्या सतत पाठपुराव्यामुळे झाली कारवाई

नव्याने कंत्राट प्रक्रिया राबविली जाणार

एसडीओंच्या अध्यक्षेखाली दोन सदस्यीय समिती गठीत

शहरात बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्यांची टोळी सक्रिय

चांदूर रेल्वे : – 

१ एप्रीलपासुन चांदूर रेल्वे शहरात सुरू झालेल्या शिवभोजन थाळीचा कंत्राट बोगस कागदपत्रांच्या आधारे प्राप्त केल्याचा प्रकार नुकताच समोर आला. बनावट कागदपत्रांच्या आधारे सागर रमेश भोंडे (राजर्षी फॅमिली रेस्टॉरेंट, चांदूर रेल्वे) यांनी मिळविलेला स्थानिक शिव भोजन थाळीचा कंत्राट अखेर २५ दिवसानंतर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी २५ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशान्वये रद्द करण्यात आला आहे. या प्रकरणात मिडीयाने सतत पाठपुरावा मांडला होता. तर अाता तहसिलदारांना नव्याने शिव भोजन थाळीच्या कंत्राटची प्रक्रिया नियमानुसार राबविण्याचे आदेश दिले आहे. तसेच अशाप्रकारे बनावट प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणुक करणाऱ्यांवर कारवाईसाठी चांदूर रेल्वे एसडीओंच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्यीय समितीव्दारे चौकशी करून कार्यवाहीचे आदेश व कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याचे आदेश दिले आले आहे. यामुळे चांदूर रेल्वे शहरात बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्यांची मोठी टोळी सक्रिय असल्याचे समजते.

चांदूर रेल्वेत शिवभोजन थाळी केंद्राचा कंत्राट घेण्यासाठी कंत्राटदारारने चक्क परवानाच बनावट सादर केल्याची बाब तक्रारकर्ते शिवसेना शहरप्रमुख स्वप्नील मानकर व सुमेद सरदार यांनी तहसीलदारांच्या निदर्शनास आणुन देऊन याबाबतची तक्रार केली होती. या प्रकरणी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ठोस कारवाई करीत कंत्राटदार सागर भोंडे यांचा कंत्राट रद्द करीत असल्याचे आदेश २५ एप्रिल रोजी निर्गमित केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये चांदूर रेल्वेचे तहसिलदार यांनी सागर रमेशराव भोंडे (राजश्री फॅमिली गार्डन), चांदूर रेल्वे याची शिवभोजन केंद्राकरिता करण्यात आलेली निवड ही बनावट प्रमाणपत्राचे आधारे केली गेली असल्याने सदर शिवभोजन केंद्राची निवड या आदेशाद्वारे रद्द केली आहे. तर चांदूर रेल्वे एसडीओंच्या अध्यक्षतेखाली सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन, अमरावती व चांदूर रेल्वे पोलीस निरिक्षक यांच्या समितीव्दारे अश्याप्रकारे बनावट प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करावी व अहवाल या कार्यालयास सादर करावा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच चांदूर रेल्वे तहसिलदारांनी नव्याने शिवभोजन केंद्राच्या निवडीची प्रक्रिया शासनाचे निर्देशानुसार राबवावी व तसा अहवाल तात्काळ या कार्यालयास सादर करावा असे आदेश दिले आहेत. शहरात बनावट कागदपत्रे तयार करणारी टोळी सक्रिय असल्याचे प्रशासनानेच कबुल केले असून त्याच्या चौकशीसाठी कमिटी स्थापन करून चौकशीचे आदेश दिले आहे. असे असल्यास शहरात आजपर्यंत मिळविलेले इतर अनेक कंत्राट हे बनावट कागदांच्या माध्यमातून तर घेतले नाही ना असाही प्रश्न निर्माण होत आहे. शिवभोजनाच्या प्रकरणात आ. प्रताप अडसड यांनी त्वरीत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तर तक्रारकर्ते व मिडीयाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ही कारवाई झाली आहे.

त्या कंत्राटदाराविरूध्द ‘एफआयआर‘ दाखल होणार का ?

अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी चांदूर रेल्वे तालुक्यात अवैध प्रमाणपत्रे तयार करणारी यंत्रणा कार्यान्वित असल्याचे निदर्शनास आल्याचे मान्य केले आणि त्यांच्या शोधासाठी चांदूर रेल्वे एसडीओंच्या अध्यक्षेखाली सह आयुक्त (अन्न व औषध प्रशासन, अमरावती) व चांदूर रेल्वे ठाणेदार यांची समिती नेमली. मात्र या आदेशात कुठेही या प्रकरणात ‘एफआयआर‘ दर्ज करून कंत्राटदार विरूध्द गुन्हे दाखल करण्याचे आदेश नाहीत. त्यामूळे त्या कंत्राटदाराविरूध्द ‘एफआयआर‘ दर्ज होईल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

शिव भोजन थाळी च्या कंत्राटकरीता नव्याने प्रक्रिया सुरू

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार व शासकिय नियमानुसार चांदूर रेल्वे येथील शिव भोजन थाळी चा नविन कंत्राटासाठी नव्याने अर्ज मागविण्याची प्रक्रिया आज दि. २८ एप्रिल पासुन सुरू झाली आहे. अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया चार ते पाच दिवस चालणार असल्याचे चांदूर रेल्वे तहसिलदार राजेंद्र इंगळे यांनी सांगीतले.

चौकशीचा फार्स कशाला

गेल्या महिन्याभरापासून शिवभोजन कंत्राट बोगस कागदावर मिळविल्याचा तक्रारी तसेच वृत्तपत्रातून बातम्या सुरू आहे. मागील आठवड्यात ते सिद्ध ही झालेत. आमदार प्रताप अडसड यांनीही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. तरीही मात्र प्रशासनाकडून तक्रार दाखल करून गुन्हा न नोंदविता विविध चौकशीचा फार्स करून प्रकरण दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे.