कडेगावच्या लेडी सिंघम तहसिलदार डाॅ.शैलजा पाटील बनल्या इन्सिडंट कमांडर ते डॉक्टर…

Google search engine
Google search engine

सांगली / कडेगांव
कडेगांव च्या महिला तहसिलदार सध्या इन्सिडंट
कमांडर ,डॉक्टर ,आशा सेवीका , सफाई कामगार ही बनल्या आहेत गत महिन्यापासून भारत देशामध्ये आलेल्या कोरोना रोगांच्या महामारीने संपूर्ण देश त्रस्त आहे.महामारीने प्रचंड हैदोस घातला आहे या महामारीच्या विरोधात लढा देताना देशभरातील डॉक्टर, आशा सेवीका पोलीस व प्रशासन , सफाई कामगार बांधव सर्व घटक आपल्या प्राणांची बाजी लावून सेवा बजावत आहेत.कडेगाव लेडी सिंघम तहसिलदार डॉ शैलजा पाटील यांनी आपल्या शिक्षणाचा वापर प्रशासकीय कामकाजात केला आहे. सध्या कडेगाव तालुक्याच्या इन्सिडंट कमांडर म्हणुन भुमिका बजावणाऱ्या डॉ.शैलजा पाटील नागरीकांची आरोग्य तपासणीही करीत आहेत .त्यांच्या वैद्यकीय शिक्षणाचा फायदा तालुक्याला होत आहे.
कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे जगातील सर्वच नागरिक दहशतीखाली आहेत. अशा परिस्थितीत देशात व राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान या संचारबंदीच्या काळात तालुक्यातील प्रशासन ‘दैवत ‘ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
तालुक्यातील जनतेसाठी प्रशासन योग्य खबरदारी घेत असून लोकांच्या आरोग्याची काळजी वेळेवर घेतली जात आहे. तर परगाहून येणाऱ्या लोकांची कडक तपासणी होत असल्याने तालुक्यात अद्याप एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही.ही सुदैवाची गोष्ट आहे. तहसिलदार डॉ.शैलजा पाटील या सध्या इन्सिडंट कमांडर म्हणुन तालुक्याची जबाबदारी पार पाडत आहेत .सुरुवातीला त्यांनी संचारबंदीचे पालन नागरीकांनी करावे यासाठी प्रत्येक गावा गावात जाऊन प्रबोधनही केले आहे.
लॉकडाऊन नंतर कडेगाव तालुक्यात परराज्यातील व दुसऱ्या जिल्ह्यातील अनेक लोक अडकलेले होते. यात लहान मुले व वयस्कर लोकांचा समावेश आहे. त्याना काही किरकोळ आजार आहे का ते पाहुन जागेवरच पाकीटातील गोळी डॉ.पाटील देत होत्या.त्यांच्या जेवणाची सोय करणे त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. चार हजार ऊस तोडणी कामगारांचा प्रश्न प्रांताधिकारी गणेश मरकड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सोडवला.
तालुक्यात जीवनावश्यक वस्तुचा साठा होणार नाही. याची गंभीर दखल घेत व्यापारी व गांवची गोडाऊऩ तपासली ,जादा दराने मालाची विक्री केल्यास कडक कारवाई करु असा इशाराही दिला होता. आतापर्यंत आपण सर्वांनी सहकार्य केले आहे, यापुढे ही ते कायम राहू देत असे अहवान त्यानी केले . घरपोंच किराणा माल देण्याची सोय हि त्यांनी काही ठिकाणी केली.
तालुक्यात एकूण 25 हजार शिधापत्रिका धारक असून एप्रिल महिन्याचे नियमित म्हणजे प्रति व्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ ,1 किलो तुरडाळ आदी धान्याचे 96 टक्के वाटप झाले तर मोफत धान्य वाटप घरोघरी विना तक्रार पोहचले यासाठी तहसिलदार डॉ शैलजा पाटील यांचे मायक्रो प्लॉनींग कामी आले. तालुक्यातील खाजगी डॉक्टर यांना त्यांनी योग्य मार्गदर्शन केल्याने तालुक्यात लॉकडाऊन यशस्वी करण्यात त्यांना साथ मिळाली व तालुक्याच्या आरोग्याची नाडी पकडत त्यांनी तालुक्यात कोरोना रोखण्यात सध्या यश मिळवले आहे.
येतगाव व खेराडे वांगी येथे घडलेल्या प्रकारात माञ तहसिलदार डॉ. पाटील यांनी आपली डॉक्टर की पणाला लावली 36 क्वारंटाईन करत त्यांना आरोग्य विषय माहिती देत आरोग्य विभागा बरोबर त्यांनीही लोकांची तपासणी केली.
एकुणच डॉ शैलजा पाटील यांनी इन्सिडंट
कमांडर ,डॉक्टर ,आशा सेवीका , सफाई कामगार बनत लोकांची काळजी घेतली त्यांच्या मानुसकीचे दर्शन तालुक्याला झाले.