संकट काळात गरिबांना व्यवस्थितपणे धान्य वितरण करा — आमदार श्री देवेंद्र भुयार  ><  संकट काळात उत्तमपणे काम करुन तक्रारी येऊ न देण्याचे केले आवाहन 

0
997
Google search engine
Google search engine

 

वरुड तालुक्यातील रेशन दुकानाची झाडाझडती 

वरुड तालुका प्रतिनिधी/
करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या काळात गरीब नागरिकांची उपासमार होऊ नये, यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. तशातच केशरी रेशन कार्डधारक आणि गरीब व गरजुंना अन्नधान्याचा तुटवडा भासू नये यासाठी त्यांच्याही योग्य तो विचार करायला हवा अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती त्यानंतर करोनाच्या पार्श्वभूमीवर केशरी रेशनकार्डधारकांना रेशनचे धान्य मिळण्याबाबत, अन्न व नागरी पुरवठा विभागाने गरीब व गरजुंसाठी उपाययोजना केल्या आहेत.
मोर्शी वरुड तालुक्यात वारंवार पुरेसे धान्य मिळत नसल्याची तक्रार येत असल्याने आमदार देवेंद्र भुयार यांनी थेट रेशन दुकानदाराला गाठले. तर रेशन दुकान उघडून मोफतचे धान्य, केशरी कार्डसाठी आलेले धान्य व पुरवठा करण्यात आलेल्या धान्यासह शिल्लक असलेल्या धान्य साठ्याची माहिती घेतली. कोरोनाच्या संकट काळात प्रत्येक गोरगरीब कुटुंबीयांना व्यवस्थितपणे धान्य वितरण करुन योगदान द्या, यापुढे तक्रारी आल्यास व गोरगरीबांची फसवणुक झाल्याचे आढळल्यास सोडणार नसल्याचे थेट तंबीच त्यांनी रेशन दुकानदारास दिली. आमदार देवेंद्र भुयार यांनी रेशन दुकानदारांना विविध प्रश्‍नांची सरबत्ती करताच दुकानदारांची भंबेरी उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
मोर्शी वरुड तालुक्यातील काही रेशन दुकानदार धान्य देत नसल्याच्या अनेक तक्रारीचे फोन आमदार देवेंद्र भुयार यांना दररोज सुरु होते. याची शहानिशा करण्यासाठी त्यांनी  रेशन दुकान गाठले. रेशन दुकानाची चौकशी करताना धान्य वाटप व साठा शिल्लक किती याची माहिती घेतली. त्यांनी पुरवठा अधिकारी यांना धान्य वितरणाबाबत होत असलेल्या चुकांबाबत माहिती दिली.
यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी रेशन दुकानदारास सुचना करुन केशरी रेशनकार्डसह इतर लाभार्थींना त्यांच्या हक्काचे अन्न-धान्य देण्याचे व संकट काळात उत्तमपणे काम करुन तक्रारी येऊ न देण्याचे आवाहन केले.