शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांची गय केल्या जाणार नाही- आमदार देवेंद्र भुयार यांनी घेतला कृषी सेवा केंद्र चालकांचा आढावा

0
675
Google search engine
Google search engine

शेतकऱ्यांना बी-बियाणे, औषधी व खते बांधावर उपलब्ध होणार

वरुड / प्रतिनिधी  : मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे अश्या परिस्थितीत संकटात सापडलेल्या तळागाळातला शेतकरी कृषी विभागाची यंत्रणा व शासनाकडे आशेने पाहतो आहे. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही योजनेपासून पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये. नांगरणीपासून ते कापणीपर्यंत शेतकऱ्याच्या जिवाला चैन नसते. तीच परिस्थिती आपलीही असायला हवी. प्रचंड संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना फसविणारेही टपून बसलेले असतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. जबाबदारी पार पाडली नाही तर गय केली जाणार नाही, ती वेळ येऊ देऊ नका, असे खडे बोल आमदार देवेंद्र भुयार यांनी सुनावले कृषी विभागाच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले.      या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशकांचा पुरवठा वेळेवर होणे गरजेचे आहे. कोरोनामुळे प्रत्येक जिल्ह्यात संचारबंदी सुरु आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांवर जाऊन कृषी निविष्ठा खरेदी केल्यास गर्दी होऊ शकते यातून विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची ग्राम पातळीवर साखळी निर्माण करुन कृषी निविष्ठा, बी-बियाणे, खते पुरविण्याचे नियोजन करण्याचे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी दिले आहेत.
खरीप हंगाम लवकरच सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा पुरवठा सुद्धा वेळेत होणे आवश्यक असल्याचेही  आमदार देवेंद्र भुयार यांनी खरीप नियोजनाबाबत आढावा बैठकीत सांगितले. शेतकऱ्यांना कपासीचे उत्तम दर्जाची बी-बियाणे उपलब्ध व्हावे, तुरीचे चागली उगवण क्षमता असणारे बियाणेच शेतकऱ्यांना मिळावे या करीता उपसंचालक कृषी विभाग यांच्याशी चर्चा करुन बी-बियानाचा साठा उपलब्ध होण्याबाबत कृषि विभागांच्या वरीष्ठ अधिऱ्यांना सुचना केल्या. यासोबतच जागतिक बाजार पेठेचा विचार करुन आयात निर्यातीच्या धोरणामुळे पुढील हंगामातील शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पडू नये या करीता जागतिक बाजार पेठेत मागणी असणाऱ्या पिकांचेच म्हणजे कडधान्याचेच उत्पादन घेण्यात यावे, असे आवाहन सुध्दा शेतकऱ्यांना आमदार देवेंद्र भुयार यांनी केले आहे. राज्यामध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. परंतू अशा स्थितीत शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रांवर कृषी निविष्ठा खरेदी करण्यास एकाच वेळी गेल्यास जास्त गर्दी होण्याची शक्यता असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कृषी सेवा केंद्र आणि शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचा पुरवठा शंतकऱ्यांना शेतावर करण्याच्या सूचना आमदार देवेंद्र भुयार यांनी दिल्या आहेत. या बैठकीत  पीक कर्जवाटप, खरीप हंगाम बियाणे, खते उपलब्धता, सर्व पीकविमा योजना, मनरेगा, भाऊसाहेब फूंडकर फळबाग योजना कृषीच्या सर्व केंद्र व राज्य पुरस्कृत योजना आदींचा आढावा आमदार देवेंद्र भुयार यांनी घेतला. या आढावा बैठकीला तालुका कृषी अधिकारी आगरकर , साळवे , मंडळ कृषी अधिकारी , कृषी सहाय्यक यांच्यासह जितू शहा, प्रमोद घोरमाडे, अमित गांधी, कुशल श्रीराव, प्रशांत गांधी, गिरीष राठी, प्रफल राठी, रमेश काळमेघ आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.