कोरोनाचा धोका टाळण्यासाठी दारू दुकाने बंद करण्याची रुपेश वाळके यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी ! 

0
2280
Google search engine
Google search engine

कोरोनाचा सर्वाधिक धोका दारू दुकानातूनच होऊ शकतो .

मोर्शी तालुका प्रतिनिधी :
अमरावती जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असतांना आता मद्य विक्री सुरु करण्यात निर्णय शासणाने घेतला आहे . त्यापासून अनियंत्रित गर्दीमुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो , जणतेचे आरोग्य सांभाळणे हे शासनाचे कर्तव्य आहे त्यासाठी मुख्यमंत्री सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे मात्र आता महसुलाचा विचार न करता कोरोना टाळण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करून राज्यातील दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश द्यावे व तातडीने मद्य विक्री बंद करावी, अशी मागणी रुपेश वाळके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे- पाटील , पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे केली आहे.
अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाने राज्यात दारू विक्री सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने काढल्यानंतर सर्वच ठिकाणी दारू खरेदीसाठी एकच झुंबड उडाल्याचे चित्र  दिसून आले. राज्यात दुकाने उघडण्यापूर्वीच मद्यप्रेमींनी दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. परिणामी, दोन व्यक्तींमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले .
अमरावती जिल्ह्यात दारू विक्री सुरू झाल्यास ठिकठिकाणी अनियंत्रित गर्दीमुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो . पोलिसांना अनेक ठिकाणी बळाचा वापर करावा लागू शकतो . अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी दारू विक्री सुरू झाली आहे. ग्रामीण भागामध्ये बहुतेक दुकाने उघडली असल्याने दारू विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे.
तेथे मद्य प्रेमी एकच गर्दी होत आहे. अमरावती जिल्हात दारू विक्री सुरू करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा असून तो घातक ठरणार आहे. सद्य:स्थितीत पोलिस प्रशासनावर ताण वाढलेला आहे. त्यामुळे शहरात दारू विक्रीबाबतचा असा निर्णय घेणे गरजेचे नाही . अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दाट लोकवस्तीचा भाग आहे. येथे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होऊ शकत नाही. परिणामी, गंभीर परिस्थिती उद्‌भवू शकते.
दारुच्या दुकानातील सततच्या वर्दळीत एकमेकांच्या संपर्काने कोरोणाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाऊनचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असताना याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होऊ नये. अवैध दारू विक्रीतून कोरोना विषाणू प्रसाराचा संभाव्य धोका लक्षात घेणे गरजेचे आहे.
या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार होऊन अमरावती जिल्ह्यातील नागरिकांच्या जिविताच्या सुरक्षेसाठी  अमरावती जिल्ह्यातील मद्य विक्री तात्काळ स्थगिती करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी रुपेश वाळके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे- पाटील , पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर , जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे केली आहे.