अकोट नपद्वारे प्रतिबंधित क्षेत्रातील हातगाड्यांवर कारवाई

0
816
Google search engine
Google search engine

आकोटः ता.प्रतिनिधी

राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा अहोरात्र राबत आहेत. अकोट नगर परिषद मार्फत वर्दळीच्या ठिकाणी फवारणी सुरू असून स्वच्छतेबाबत मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, नप अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता व नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी भाजीबाजार बस स्टॅन्ड रोडवर स्थानांतरित करण्यात आलेला आहे. तरीसुद्धा काही नागरिक सोशल डिस्टन्सचे पालन न करता जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करीत आहेत तसेच फळविक्रेते सुद्धा प्रतिबंधित क्षेत्रात अवैधरित्या हातगाडीने फळे व तत्सम वस्तू विकत असल्याचे पालीकेच्या निदर्शनास आले.अकोट नपचे मुख्याधिकारी डोल्हारकर यांनी ही बाब गंभीरतेने घेऊन आरोग्य विभागाचे पथकामार्फत प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या गाड्या व हातगाड्या जप्त करण्याची मोहीम राबवली. मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांचे मार्गदर्शनात आरोग्य निरीक्षक चंदन चंडालिया, यांचेसह एस एस सावरकर, अब्दुल सलिम अब्दुल खालिक, चालक लखन चंडालिया, विकी डेंडुले, रोहित मोगरे, दिनेश मोगरे, गिरीश महाजन, उमेश गिगणे, आनंद मर्दाने, सुमित बेंडवाल, जितेंद्र मर्दाने यांनी ही मोहीम राबवली.