अवैध सागवान तस्करी करणारे पोलिसांच्या जाळ्यात 1 ताब्यात तर दोन फरार चांदुर बाजार:-

Google search engine
Google search engine

अवैध सागवान तस्करी करणारे पोलिसांच्या जाळ्यात
1 ताब्यात तर दोन फरार

चांदुर बाजार:-

ब्राह्मणवाडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती च्या आधारे त्यांनी आज सकाळी विषरोळी कालव्याच्या परिसरात रेड केली असता एक आरोपी आणि दोन मोटरसायकल जप्त करण्यात त्यांना यश आले आहे.तर अंधाराचा फायदा घेत दोन आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहे.

तसेच या कार्यवाही ची माहिती वनविभागाला दिली असुन आरोपी व मुद्दैमाल त्यांचे ताब्यात देण्यात आला आहे.ही कार्यवाही अचलपूर पोलीस उपविभागीय अधिकारी पोपट अबदगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सचिन परदेशी, सहायक पोलीस निरीक्षक अमूल बच्चव,निलेश डांगोरे यांनी केली