आकोट नगरपालीकेचे आयटीआय मध्ये सुसज्ज कोविड केअर सेंटर

0
1701
Google search engine
Google search engine

आकोटः ता.प्रतिनिधी

अकोट नगरपालिका द्वारा आयटीआय येथे सुसज्ज कोविड 19 केअर सेंटर सज्ज ठेवण्यात आले आहे. याठिकाणी पंचवीसच्या आसपास कॉट व बेड तयार ठेवण्यात आले असून अकोला जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार नगरपालिका मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने अथक परिश्रम घेत सेंटर सर्व सुविधांयुक्त तयार ठेवले आहे

आपातकालीन वैद्यकीय सुविधांसाठी सुसज्ज व्यवस्था ठेवण्याचे आदेश असल्याने कोविड 19 केअर सेंटर सुसज्ज ठेवण्यात आले आहे.या केअर सेंटरमध्ये सर्व सुविधांच्या सज्जतेसाठी जीवन आढाव नगर रचनाकार, उमेश माळी सहा.नगर रचनाकार,रोशन कुमरे कनिष्ठ अभियंता,आरोग्य निरीक्षक चंदन चंडालिया व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परीश्रम घेतलेत

.या कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टरांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापण्यात आला असून इतर व्यक्तींसाठी बेड चादर उशी आंघोळीला व पिण्यासाठी पाणी व इतर सुविधा तयार ठेवण्यात आल्या आहेत सदर इमारतीचे सॕनिटायझेशन करून आपातकालीन आरोग्य सुविधेसाठी केअर सेंटर सज्ज आहे.

सदर केंद्रांमध्ये आवश्यक असलेले पलंग गाद्या चादरी उशी इत्यादींची व्यवस्था असून स्वच्छतेच्या दृष्टीने संडासमध्ये पाण्याची बकेट मग व इतर सुविधा स्वच्छता सेवा हाउसकीपिंग चे पूर्ण नियोजन करण्यात आले असून सदर इमारतीचे सॕनिटायझेशन करण्यात आले आहे.

त्यामुळे नागरिकांनी शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी केले आहे.