रस्त्यावर मिळालेला चेक केला पोलिसांना सुपूर्त

0
1176
Google search engine
Google search engine

अक्षय जायले या तरुणाची अशीही सजगता

अकोटःसंतोष विणके

कोरोना आपत्तीमुळे सर्वत्र काळजीचे वातावरण आहे. अनेकांचे व्यवसाय रोजीरोटी बंद आहे.संपूर्ण देश आर्थिक सावटाखाली आहे अशातच अक्षय पाटील जायले या संवेदनशील तरुणाला कॉलेज रोड सरस्वती नगर मार्गावर दि.10 मेला अज्ञात व्यक्तीचा रक्कम लिहलेला चेक पडलेला दिसला. संचार बंदीमुळे रस्त्यावर कोणीच नसल्याने त्याला कळेना तो चेक कोणाचा आहे त्याने लगेच तो चेक नायब तहसिलदार हरीश गुरव यांच्या उपस्थितीत अकोट शहर ठाणेदार संतोष महल्ले यांच्या स्वाधीन करून आपल्या सजगतेचा परिचय दिला.

पोलिसांनी सदर चेक वरील श्रीनाथ मेडिकल हे नाव लक्षात आले तोपर्यंत काहींनी चौकशीतून तो चेक प्रशांत ठोकळ यांचा असल्याने त्यांना फोन द्वारे कळविले. सदर चेक 4500 रुपये रकमेचा होता. आधीच संचारबंदी अन त्यात बँकांवर लागलेल्या लांबच लांब रांगा अशा दिव्यात तो चेक सुखरूप मिळाल्याने ठोकळ यांनी अक्षय पाटील जायले या तरुणाचे मनोमन आभार मानले.

तर पोलिस प्रशासनानेही या तरुणाच्या प्रामाणितेचा व सजगतेचे कौतुक केले. अक्षय जायले या तरुण निसर्ग मित्राने वृक्षलागवडीसाठी अनेक उपक्रम राबवत हजारो वृक्ष लावले आहेत.त्याच्या या चांगुलपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.