देशातील मजूर… चालत आणि मरत !

0
917
Google search engine
Google search engine


——————————————
देशातील मजूर… चालत आणि मरत!
——————————————

भारत

कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो…आणि म्हणूनच, “खरा भारत खेड्यातच!.” असे म्हटले जायचे.परंतु जागतिकिकरन आले आणि प्रत्येक क्षेञात जीवघेना स्पर्धा वाढली .औद्योगिकीकरण झपाट्याने झाले…आणि देशातील मोठ्या शहरांना, सुज यायला लागली.खेड्यात जमिनीच्या वाटण्या झाल्या!अवेळी पाऊस…त्यामुळे बेभरवश्याची शेती झाली.त्यामुळे खेडेगावातील बेरकी शेतकरी व शेतमजूर यांचे खेडेगावात भागेनासे झाले.जगाचा पोशींदा असणारा शेतकरी ,याच्या शेतीमालाला आजही हमीभाव मिळत नाही.आशा विविध कारणामुळे… शहराकडे लोंढे वाढत गेले.शहरं महाअजगरासारखी वाढत गेली.शहरांची भूक अजगरासारखीच झाली!भांडवलदार व धोरण आखणारे यांच्यात दिलजमाई आसणारी युती झाली!विकासाच्या नावावर, भांडवलदारांना प्रत्येक सरकारनी झुकते माप दिले,त्यातूनच ते मोठे झाले.श्रमीक मजूर माञ रांञदिवस काबाडकष्ट करत राबत राहीले.त्यांच्या तळहातावर उद्योगधंदे वाढत आसतांनाही … श्रमीकांचा शास्वत आसा विकास झालाच नाही.
गावात, उपाशी मरण्यापेक्षा शहरात मजूरी करून “पोटाला दोन वेळसचे जेवन तरी मिळेल !”या भूमिकेतून उत्तरप्रदेश,मध्यप्रदेश,राज्यस्थान,बिहार,छतीसगढ,आंध्रप्रदेश,तेलंगणा,कर्नाटक,प.बंगाल,गुजरात, या राज्यातून… लाखोच्या घरात, मजूर लोक दिल्ली,मुंबई,पुणे व देशातील विविध मोठ्या शहरात…”मिळेत ते काम करत राहीले! या स्थलांतरीत मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय…विकासकांनी केलीच नाही!” सरकार मायबापांनीही आजवर लक्ष दिले नाही.
शहरातल्या विकासकांनी शहरालगतच्या गोर,गरिब,व आदिवासींच्या जमिनी…सेझच्या नावाखाली… कवडीमोल भावाने घेतल्या आणि सिमेंटकाॅक्रीटची भली मोठी जंगले उभारली!समुद्रात भराव टाकून त्यालाही लहान केले.श्रमीक मजूरांच्या श्रमावर मोठ,मोठ्या ईमारती उभ्या राहील्या..!मजूरांच्या श्रमामुळे …विकासक गडगंज झाले.मजूरांच्या श्रमामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली!
जागतिकिकरणाचे भारत देशावर परिणाम झाले.”देशातील शहरांचा विकास होत गेला आणि देशातील खेडे भकास होत गेली!”
आणि म्हणून देशात कांही विचारवंत उपहासाने म्हणू लागले…”शहरातला इंडिया आणि खेड्यातला भारत!”
जगामध्ये अचानकच “कोरोना”महामारी आली आणि जग भयभीत झाले.या महामारीने, भारत देशातही, पाय पसरले!आणि शहरं व खेडी येथील अर्थचक दोन महिने झाले थांबलं!या महामारीची संक्रमण साखळी तोडण्यासाठी, देश अचानकच… लाॅकडाऊन करण्यात आला! देशात अभूतपूर्व संचारबंदी लावली आणि सर्व व्यवस्था ठप्प झाली!शहरातील मजूरांचे काम बंद झाले.खाण्याचा प्रश्न निर्माण झाला.ही महामारी आटोक्यात येईल असे वाटेनासे झाले…मजूरांचा धीर खचला! आणि जगण्यासाठी विविध शहरातील कोटीच्या घरात मजूर वाहानाशिवाय… १५००किमीवर आपले राज्य व गाव गाठायला पायी निघाले !कांहीनी दिल्ली,मुंबई,पुणे येथून सुरवातीच्या दोन,तीन दिवसात ३००किमीचा प्रवास केला.देशातील नॅशनल हायवेवरून लाखो मजूर चालतानाचे चिञीकरण समाजमाध्यमांनी दाखवले…त्या मजूरांच्या असाहय वेदना …ख—या भारताच्या होत्या.पायी चालणा—या मजूरांना वाटेतच आडवले आणि त्या, त्या, राज्यात,जिल्ह्यात त्यांची “निवारा केंद्रात”सोय केली.या मजूरांनी पहिला लाॅकडाऊन २१दिवस,दुसरा १८दिवसाचा लाॅकडाऊन तेथेच…जे मिळेल ते खाऊन काढला!”परंतु तिसरा लाॅकडाऊन ४मे ते १७मे,१४दिवसासाठी …घोषित झाला आणि निवारा केंद्रात …कोट्यावधी मजूरांचा जीव गुदमरायला लागला!या मजूरांची एकच मागणी…
“आम्हाला,आमच्या राज्यातील गावात पोहचायचे…येथे मरण्यापेक्षा चालत मरू!”आशी त्यांनी भूमीका घेतली आणि खरा भारत… पायी चालतही राहीला. आणि मरतही राहीला!
हाताला काम नाही!घरात खायला कांहीच नाही.घरमालक किराया मागायले.मुलाबाळांची उपासमार होवू लागली.लाॅकडाऊन वाढणारच!त्यातच दिल्लीत आणि मुंबईत, कोरोनाचा वाढता धोका!या मजूरांना त्यांच्या गावाकडून नातेवाईकांचे बोलावणे येऊ लागले!या मजूरांची उपासमारी होतांना, यांच्या श्रमावर मोठे झालेल्या बांधकाम व्यावसाईकांनी,उद्योगमालकांनी मजूरांना वा—यावर सोडले! एखाद,दुस—या उद्योग मालकांनी कांही मजूरांना धीर दिला .अनेक उद्योग,व्यावसायीक मालकांनी संकट काळात या मजूराकडे पाठच फिरवली!एक निराशेचं आभाळ घेवून हे मजूर वाटेल त्या मार्गाचा आवलंब करत.पायी चालत राहीले!लाॅकडाऊनच्या काळात,ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते व भांडवलदार,नोकरी करणारे अधिकारी,उद्योगपती,चांगली परिस्थिती असणारे लोकप्रतीनिधी ,व्यावसायीक हे घरातल्या ए.सी.त ,फॅनखाली बसून …पायी चालणारे ञासलेले मजूरांचे चिञ टी.व्ही.वर पाहात होते.यांच्या घरातील महिला वेळ जात नाही म्हणून …वेगवेगळ्या रेसीपी घरात बनवत होते..अभिनेते व अभिनेञी हे घरात कसा वेळ घालवतात ते टी.व्ही.वर दाखवले जात होते.
यातूनच देशातल्या गरिब आणि श्रीमंत यांच्यातली दरी दिसून येत होती.गरिब मजूर पायी चालतात!आणि ए.सी.त बसून श्रीमंत हे चिञ पाहातात…!
“इंडिया घरात सुरक्षित राहीला! आणि भारतच माञ वैशाख वोनव्यातील भर तापत्या उंन्हात, हायवेवरून चालत राहीला आणि मरतही राहीला!.”
लाॅकडाऊनमध्ये …वाहाने बंद झाली! प्रवासी वाहातुक बंद झाली!गावाकडे तर परतायचे..यासाठी मजूरांनी वेगवेगळे फंडे लढवले…कोणी ट्रक,टेम्पो,कंटनेर,सायकल,रीक्षा,टॅक्सी व मिळेल ते वाहान.ज्यांच्याकडे पैसे होते ते वाहानातून निघाले .ज्यांच्याकडे पैसे नव्हते ते पायी चालत निघाले!१९४७ला भारत —पाकिस्तान फाळणी झाली तेंव्हा प्रचंड संख्येने लोकांनी स्थलांतर केले होते आता त्यानंतर भारत देशात कोरोनामुळे अनेक लाखोच्या घरात मजूरांनी स्थलांतर केले आहे.
मध्येप्रदेशातील,बालाघाटचा रामू नावाचा तरूण मजूर… हैद्राबाद येथे मजूर म्हणून काम करत होता.कोरोना महामारीत, त्याची मजूरी बंद झाली!उपासमारीची कु—हाड, त्याच्यावर कोसळली!
त्यांने आपल्या गावाकडे …पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला.सोबतीला गर्भवती पत्नी नाव धन्यता होती.छोटी गोंडस लहान पोरगी अनूरागिणी..गर्भवती पत्नीला चालवत नेहणे शक्य नव्हते.हैद्राबाद ते बालाघाट७००किमीचा जीवघेणा प्रवास! रामूने गावी जाण्याचा निर्धार पक्का केला!त्याने खास लाकडी गाडा!बनवला. त्याला चाके लावली. त्यावर त्याने आपल्या मुलीला व गर्भवती पत्नीला, बसवले आणि वैशाख वोनव्यातील तापतं उन डोक्यावर घेत…तो आपल्या संसाराचा गाडा मोठ्या ताकतीने,धैर्याने,जिद्दीने…घाम गाळत,घाण्याच्या बैलासारखा ओढत राहीला आणि विशेष म्हणजे ,तापत्या उंन्हात…गाडा ओढत …लाल रक्त पायातून सांडत… तो बालाघाटला पोहचला!हा रक्ताळलेला भारतातील तरूण मजूर ,याला सलाम! रामूचा हा जीवघेना पायी प्रवास समाजमाध्यमातूनच कळाला!आणि संवेदनशील माणसांच्या नयनातून…अश्रू आपोआपच ओघळले!
करनूल—आंध्रप्रदेश येथे, छतीसगढचा एक मजूर “आपल्या पोटाची आग बुजवण्यासाठी!”मजूरीसाठी गेला होता. परुंतु कोरोना महामारीत, त्याची मजूरी बंद झाली आणि त्यानेही आपल्या राज्यात… परतण्याचा निर्धार केला.त्याच्या दोन लहान मुली त्यांना चालवायचे नाही असे ठरवले आणि त्याने सरळ एक कावड केली .त्यात त्याने मुलीला बसवले आणि १२००किमीच्या प्रवासाला चालत निघाला! हा आधुनिक श्रावण बाळ चालतांना आपण पाहीला!त्याच्या मागे दहा,पंधरा मजूर चालत होते.आसा हा आपला भारत देश तापत्या उंन्हातही चालत राहीला!
राज्यस्थानातही आशाच एका मजूराची व्यथा पुढे आली.त्या मजुरावर उपासमारी वेळ आली. त्यांने गावी जाण्याचा निर्णय घेतला.पायी चालायचे होते परंतु सोबतीला अपंग मुलगा होता.त्याला चालवायचे कसे!तेंव्हा त्या अपंगाच्या बापाने, एक जणाची सायकल चोरली आणि त्या सायकलवरून त्यांने घर गाठले आणि ज्याची सायकल चोरली त्याला चिठ्ठी लिहून…सायकल का? चोरली ते सांगितले व माफ करावे !असेही सुचवले!आणि आपली प्रामाणिकता त्या मजूरांने दाखवली!
खरं तर ही महामारी लवकर आटोक्यात येणार नाही व लाॅकडाऊन वाढवावाच लागेल.हे पुढे दिसत असल्याने व मोठ्या शहरातील गर्दी कमी करण्यासाठी… विविध राज्यात मजूरांना परतण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारांनी मोफत “श्रमीक रेल्वे !”सोडण्याची सोय केली आसतांनाही,हे मजूर, जीवघेना पायी …प्रवास करतच राहीले!हे विशेष आहे.
पुणे जवळील ,इंदापूर येथे “राजनांदगाव”(छतीसगढ)येथील१३ मजूर, मजूरीने काम करत होते.त्यांचेही काम बंद झाल्याने ते ही, एक निर्धार करत …पायी चालत ,छतीसगढला निघाले ते१४ मे रोजी, उस्मानाबाद जिल्ह्यातील, कळंब तालुक्यातील, कन्हेरवाडी पाटीजवळ. चालून,चालून थकल्याने व केवळ बिस्किटावरच इंदापूर ते कळंब पायी प्रवास करत आले होते.त्यामुळे कडक उन्हांचा,तापता कडाका असल्याने ,त्यांनी आपल्या डोक्यावरील बॅगा खाली टेकवल्या व सुजलेल्या पायाला वीश्रांती मिळावी म्हणून उपाशीपोटीच…यातनामय चेहरे करत,झाडाच्या सावलीखाली विसावले होते.चेह—यावर भिती!पोलीस पकडतील का? प्रश्न!
उपासपोटी पायी चालणा—या मजूराची माहीती, तेथील देवडा बंधूना मिळताच त्यांनी गरमा,गरम जेवन या १३मजूरांना दिले!तेंव्हा त्या मजूरांना ते ज्या झाडाच्या सावलीखाली बसले होते ते झाड कल्पतरूच वाटले असावे!पायी प्रवास करतांना जवळ पाणी नसते!भाकर नसते!आशातच सावली मिळाल्यावर पाणी आणि जेवन मिळाल्यावर किती छान होईल!या गोष्टीसारखेच मजूरांना जेवन मिळाले तेंव्हा पुढे चालायचं बळ त्यांना मिळालं!देवडा बंधूची माणुसकी कौतुक करावे तेवढी कमीच आहे.चालणा—या लाखो मजूरांचे अश्रू पुसण्याचे काम मराठी माणसांने केले!
मराठवाड्यातील हिंगोली येथील, शिरड—शहापूर येथे मध्यप्रदेशातील १८मजूर काम करत होते.त्यांनाही उपासमारीच्या झळा बसू लागल्याने ,त्यांनाही आता, मध्यप्रदेशला पोहचायचं होतं.त्यांना कळाले, परभणी येथून ट्रेन जाणार आहे .परंतु हिंगोलीहून परभणीला पोहचण्यासाठी वाहानेच नाहित.तेंव्हा या मजूरांनी १४मे रोजी ,हिंगोली ते परभणी पाय सुजेपर्यंत , पायातून लाल रक्त सांडस्तोर…आपल्या बायका व लहान मुलांना चालवत पायी प्रवास केला! डोक्यार ओझे,हातात सामान,कडेवर लहान लेकरं! आसा मजूरांचा पायी प्रवास…!
दि.१३मे रोजी ,कोल्हापूर येथील परप्रांतीय मजूरांना “श्रमीक रेल्वेने १४००मजूरांना, रेल्वे सॅनिटायझर करून पाठवले. त्या अगोदर ४०००परप्रांतीय मजूरांना रेल्वेने पाठवले होते. त्या मजूरांचा खर्च शासनाने केला आहे.तेवढ्या मजूरांना पाणी व जेवन आम्ही दिले.हे तेथील पालकमंञी सतेज पाटील यांनी सांगितले होते.कोल्हापूरकरांची माणुसकी आम्ही विसरणार नाहीत असे त्या परप्रांतीय मजूरांनी प्रतिक्रिया नोंदवल्या!
मराठवाड्यात विविध जिल्ह्यात, जे परप्रांतीय मजुरीसाठी …मजूर म्हणून आले होते .त्यांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी, जिल्ह्यातील शासकीय यंञणांनी औरंगाबाद रेल्वे स्टेशन पर्यंत बसने सोडण्याची व्यवस्था केली आणि त्या पध्दतीने…गुरूवार दिनांक १४मे रोजी ,औरंगाबादहून दूपारी दोन वाजता उन्नावला व राञी आग्रा येथे जाण्यासाठी, आठ वाजता ट्रेन असल्याने, उस्मानाबाद जिल्ह्यातून ११बस,लातूर जिल्हा ६बस,परभणी जिल्हा ९बस,महामंडळाच्या बसनी या मजूरांना औरंगाबादला पोहचवले,त्या दिवशी तेथे परप्रांतीय मजूर, एखाद्या मोठ्या याञेसारखे जमले होते.तेथे त्यांना निवारा उभा करून .औरंगाबाद येथील अनेक अदृष्य हातांनी पाणी ,जेवन दिले होते.सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.त्या दिवशी रेल्वेने उन्नावला १४६४व आग्रा येथे १४००मजूरांना रेल्वेने सोडले होते.आशी आकडेवारी तेथील अधिकारी यांनी सांगीतली होती.
या मजूरांचा बस व रेल्वेचा सगळा खर्च महाराषट्र राज्याने उचलला.
दि.९मे ते१४मे या कालावधित
१ लाख,६ हजार,२४परप्रांतीय मजूरांना, राज्यातील परिवहन महामंडळाच्या ७हजार२२७बसद्वारे त्या त्या राज्याच्या दिल्ली,गुजरात,मध्यप्रदेश,छतीसगढ तेलंगणा,कर्नाटकच्या सिमेपर्यंत मोफत सोडल्याची माहिती परिवहन मंञी मा.अनिल परब यांनी दिली होती. महामंडळांच्या बहनी लाखो मजूरांची पायपीठ थांबवली म्हणून गरिबांची लाल परी गरिब मजूरांच्या कामाला आली!
दि.१६मे पर्यंत रेल्वेने …१०७४विशेष श्रमीक रेल्वेने, देशातील, विविध राज्यात,विविध राज्यातील अडकून पडलेल्या परप्रांतीय मजूरांना जवळ,जवळ १४लाख मजूरांना पाठवल्याचे… रेल्वेमंञी पियुष गोयल यांनी सांगितले आहे.व दररोज २लाख मजूरांना रेल्वे, त्यांच्या राज्यात पाठवत आहे व पुढच्या कांही दिवसात दररोज, तीन लाख मजूरांना रेल्वे सोडेल असे ही त्यांनी सांगितले आहे.रेल्वेने लाखो मजूरांची पायपीठ थांबवली!श्रमीक रेल्वे श्रमीकांच्या कामाला आली!
तिस—या लाॅकडाऊनमध्ये दि.१२मे पासून श्रमीक रेल्वे व बसनी सरकार ,परप्रांतीय मजूरांना मोफत पाठवत असतांनाही अनेक मजूर आजही जीवघेना पायी प्रवास करत आहेत.ट्रक,कंटनेरमधून प्रवास करत आहेत…आणि त्यातच ते मृत्यूला कवटाळत आहेत…!
आणि म्हणूनच म्हणावे लागते आहे…”भारत चालत आणि मरत…!”
जालना येथे ,मध्यप्रदेशमधील कांही मजूर कामाला होते. त्यांना गावी परतायचे होते म्हणून ते जालना ते औरंगाबाद रेल्वे पटडीने २१मजूर पायी चालत चालले होते…करमाड रेल्वे स्टेशनपासून सटाना शिवारातील रेल्वे रूळावर,औरंगाबाद २५किमीवर आसतांना… ते मजूर थकल्याने पहाटे, तेथेच बसले होते .तेंव्हा एका मालगाडीने १६जणांना तेथेच चिरडल्याची घटना८मे रोजी, सकाळी कळली तेंव्हा सबंध देश हळहळला होता!भारत कसा मरत होता!व चालत होता!हे वेदनादायी …मजूरांचा पायी प्रवास ञासदायक कसा ठरतो आहे ते आपण सुरक्षित घरात बसून पाहत होतो.
ही घटना ताजी आसतांनाच, काल दि.१६मे रोजी, उत्तरप्रदेशमध्ये …आशीच मजूरांच्या आपघाताची घटना घडली !आणि देश सुन्न झाला!
प.बंगाल व झारखंडचे अनेक गरिब ,मजूर दिल्ली येथे मिळेल ते काम करत मजूरी करताहेत.परंतु लाॅकडाऊनमुळे या मजूरावर उपासमारीची वेळ आली आणि त्यांनी दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतला …कोणी पायी चालत!कोणी रीक्षा,टॅक्सी,ट्रक मिळेल त्या वाहानातून आपआपल्या राज्यात परतायला लागले!
दिल्लीहून —प.बंगाल,झारखंडला ट्रकने जाण्यासाठी, ट्रक चालक,भरमसाठ पैसे घेत आहेत.दिल्ली ते गोरखपूर, आडिच हजार,तीन हजार कसा घेतो .याचे स्टिंग आॅपरेशन कांही चॅनलवाल्यांनी केल्याचे उघड झाले आहे.ज्यांच्याकडे पैसे आहेत ते आशा ट्रकमधून जीवघेना प्रवास करताहेत आणि कसे मृत्यू स्वत:हून ओढवून घेत आहेत ते आपण टी.व्ही वर पाहीले आहे.
दिल्लीहून एका ट्रकमध्ये…प.बंगाल व झारखंडच्या कांही गोर ,गरिब मजूर चालले होते त्या ट्रकमध्ये ६१मजूर होते…तो ट्रक मजूरांना घेऊन काल दि.१६/५/२०रोजी,उत्तरप्रदेशमधील
औरैया येथे पहाटे साडेतीन वाजता पोहचला होता.ते चहासाठी तेथे थांबले होते.तेवढ्यात राज्यस्थान कडून येणा—या मिनी ट्रकने धडक दिली आणि मजूरांनी भरलेला ट्रक वेगाने पलटी झाला!दोन ट्रकमध्ये प्रचंड धडक झाली आणि मजूरांनी भरलेला ट्रक रस्त्याकडेलाच आपघाताने पडला तसा आपटला चिरडला!आणि त्या अपघातात ते मजूर जाग्यावरच २४जण ठार झाले!रक्ताच्या थारोळ्यात त्या मजूरांचे मृत्यूदेह पडले!आणि उत्तरप्रदेशच ,प.बंगाल,झारखंडच…नव्हे तर देशावर शोककळा पसरली! देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब तेथील मुख्यमंञी मा.योगीजी यांनी दु:ख झाल्याचे व व्यथीत झाल्याचे सांगितले.आणि नेहमीप्रमाणे योगीजींनी मृत्यू पावलेल्यांच्या प्रत्येक नातेवाईकांना दोन लाखाची मदत जाहीर केली!२४मजूर अपघातात ठार!त्यांना गावात परतायचे होते आता त्यांची प्रेतेच …त्या गावात पोहचतील!भारतातील हा श्रमीक मजूर कसा चालत राहीला आणि मरत राहीला!हे आपण पाहिले.
छतरपूर येथेही कालच आशीच दु:खद घटना घडली…महाराष्ट्रा तून…उत्तरप्रदेशला कांही मजूर ट्रकने चालले होते त्या ट्रकला आपघात झाला आणि ६मजूर ठार झाले.हा आपघात आग्रा—लखौनो हायवेवर घडला!आणि पाहाणारे सुन्न झाले!
कोरोना महामारीत….
“इंडिया घरातच सूरक्षित बसला आणि भारत माञ चालत आणि मरत राहिला!”हे चिञ पाहावयास मिळाले.लाॅकडाऊनच्या काळात जे मजूर जीवघेना पायी प्रवास करत निघाले होते व जे मजूर विविध वाहानातून प्रवास करत होते त्यापैकी अंदाजे ५००मजूरांचा मृत्यू देशामधील विविध अपघातात झाला आहे.
ही चिंतेची बाब आहे.

लेखक
प्रा.राजा जगताप
उस्मानाबाद