धक्कादायक; उदगीर मध्ये एकाच दिवसात 10 कोरोना पोसिटीव्ह

0
523
Google search engine
Google search engine

धक्कादायक; उदगीर मध्ये एकाच दिवसात 10 कोरोना पोसिटीव्ह

लातूर जिल्हयातील उदगीर मध्ये आज एकाच दिवसात 10 कोरोना बधितांची नोंद झाली असून यात लातूर शहरातील सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत.
उदगीर शहरातील कोरोना बाधितांच्या संपर्कातील 17 जणांचे स्वाब तपासण्यात आले. त्यात 10 जण पोसिटीव्ह असून, 4 जण निगेटिव्ह तर तिघांचे अहवाल प्रलंबित आहेत. तर लातूर शहरातील 7 जणांचे स्वाब तपासणीत निगेटिव्ह आले आहेत.
लातूर जिल्ह्यातील 24 जणांचे स्वाब तपासणीसाठी आले असता त्यात उदगीरचे 17 तर लातूर चे 7 होते. दरम्यान, उदगरीमधून एकाच दिवशी 10 जणांचे अहवाल पोसिटीव्ह आल्याने चिंता वाढली आहे.
आता परेंत उदगीर मध्ये मयत महिलेसह 31 रुग्ण आढले होते; त्यात 10 ची भर पडून उदगीरची संख्या 41 झाली आहे. त्यातील 21 जण कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहेत. प्रारंभी एक महिलेचा मृत्यू झालेला आहे. तर 19 जणांवर उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.