कोरोना हरविण्या करीता शेतकऱ्यांचे मुलांचे हात सरसावले.

0
831
Google search engine
Google search engine

कृषि विद्यापीठ अकोला च्या माजी विद्यार्थ्यांनचा मानवीय संवेदना जपनारा उपक्रम

अकोलाः संतोष विणके

कोरोनाला हरविण्या करीता शेतकऱ्यांचे मुलांचे हात सरसावले आहेत.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला च्या माजी विद्यार्थ्यांनी मानवीय संवेदना जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत लाखोंची मदत जमा केली आहे.यामध्ये
( 2013 to 2017- LL Series ) च्या माजी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ₹ 1,25,000/- रुपये रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली आहे.

कृषि विद्यापिठात शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या विचारांची मशाल पेटवत एकत्र येऊन, कोरोना ग्रंस्तांच्या मदतीसाठी खारीचा वाटा उचलत, मुख्यमंत्री सहायता निधीस आर्थीक मदत केली आहे.तसेच विद्यापिठातील DD,EE,FF,GG,HH,II,JJ,KK,LL या सिरीजच्या माजी विद्यार्थ्यांनी पन मुख्यमंत्री सहायता निधीत भरभक्कम मदत दिली आहे.

विशेष म्हणजे यातील 90% विद्यार्थी हे शेतकरी पुत्र आहेत. एकीकडे लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडलेले आहे व येणारे पुढील दिवस आर्थिक दृष्ट्या अत्यंत धोक्याचे सुद्धा आहेत. अशी परिस्थिती असतांना सुद्धा प्रत्येकाने आपली सामाजिक बांधिलकी जपत, या संकटकाळी आपल्या आपल्या परीने मदत करून कोरोना ग्रंस्तांच्या मदतीच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलला आहे. विशेष म्हणजे #AgricosAgainst Corona# या उपक्रमा मधुन विद्यापीठाच्या बऱ्याच जुन्या मित्र मैत्रिणीच्या आठवणींना उजाळा मिळुन दुरावलेली मैत्री पुन्हा घट्ट होत आहे.

कृषी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांन द्वारे केलेले कार्य खरच कोतूकास्पद आहे. महत्वाचे म्हणजे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केलं आहे.