…..यापुढे शेतकर्यांच्या अंगावर जाताना दहा वेळा विचार करा- प्रशासनावर खा.ओमराजे भडकले !

0
568
Google search engine
Google search engine

खा.अोमराजेंचा रुद्रावतार , प्रशासनला सुनावले खडे बोल!
शेतकर्‍यांच्या अंगावर जाताना यापुढे दहा वेळा विचार करा

उस्मानाबाद / प्रतिनीधी
आज उस्मानाबाद शहरात एक कोरोनाचा रुग्ण सापडल्यामुळे शहरात अचानकच बाजारपेठ बंद झाली होती त्यासाठी तात्काळ खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलासदादा पाटिल हे दोघे धारासुर मर्दीनी परिसराची पाहणी करण्यासाठी गेले असता तेथील उपस्थीत शेतकर्यांनी बंद बाबत तक्रार केली दरम्यान खासदार ओमराजेंनी चांगले उपस्थीतांना सुनावले
असा थेट इशारा देऊन अोमराजे निंबाळकर यांनी पोलिस प्रशासनासह तहसिलच्या अधिकार्‍यांना चांगलेच खडे बोल सुनावले. शेतकर्‍यांच्या अंगावर जाताना यापुढे दहा वेळा विचार करा असेही खासदारांनी सुनावले.
आज अचानक बाजारपेठ बंद झाल्यानंतर सर्वांची त्रेधातिरपीट उडाली होती. काही शेतकर्‍यांनी थेट अोमराजे व आमदार कैलास पाटील यांच्याकडे गार्‍हाणं मांडले होते. दोघांनी धारासुर मर्दिनी मंदीर परिसरामध्ये जाऊन पाहणी केली. त्यावेळी सोबत डीवायएसपी, दोन्ही पोलिस ठाण्यांचे प्रभारी, महसुलचे उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार उपस्थित होते. तेव्हा अोमराजे यांचा रुद्रावतार सगळ्यांना पाहयला मिळाला. आॅर्डर नसताना तुम्ही कोणत्या अधिकाराने बंद करत होता? या प्रश्नाचे उत्तर अधिकार्‍यांकडे नव्हते.तुम्ही मर्जीचे मालक आहात का? जनता तुमचे ऐकते म्हणुन त्याना गृहित धरु नका, त्यांना विश्वासात घ्यायला कमीपणा वाटतो का? जवळच असलेल्या पोलिस प्रशासनाच्या अधिकार्‍यांकडे वळत तुमची शेतकर्‍यांवर दंडुका चालवायची हिंमत कशी होते, गरीब शेतकरी त्याचा माल विकायला आला होता तो तुम्हांला काय त्रास देतोय ? त्यांच्याकडं माणुसकी च्या भावनेन बघायच सोडुन सराईत गुन्हेगारासारखी वागणुक देण्यापर्यंत तुमची मजल चालली हे मी खपवुन घेणार नाही. लक्षात ठेवा जनता सहन करते म्हणुन तुम्ही पोथी अोळखु नका. हे शेवटच् सांगतो, यापुढे अोमराजेंशी गाठ आहे. यावेळी अधिकार्‍यांना नजरेला नजर द्यायचीही हिंमत झाली नाही. राहिले. खासदाराचा असा अवतार बघुन सगळ्यांचीच घाबरगुंडी उडाली होती आदेश नसताना आगाऊपणा करायला कोण सांगितला होता ?असा प्रश्न त्यानी केला सगळ्यांनाच बघाव लागेल असे म्हणुन अोमराजे यांचा आता नेमका रोख कोणावर आहे हे देखील लक्षात आले