आकोटमध्ये मान्सुनपुर्व नाले सफाईस सुरवात

0
479
Google search engine
Google search engine

अकोटः संतोष विणके

नगरपरिषदेच्या आरोग्य विभागा मार्फत शहरात मान्सुनपुर्व सफाईच्या कामांना सुरवात झाली आहे.दर्यापुर रोड रेल्वेपुला पासुन ते खानापुर वेस कडे जाणा-या मोठया नाल्याचे पोकलेन मशिन मार्फत सफाई करण्यात येत आहे. संभाव्य पावसाळा व कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता नाले सफाईची मोहीम नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने२३.मे पासुन नाले सफाईस युद्धपातळीवर हाती घेतले आहे.

मुख्यधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी दिलेल्या आदेशानुसार चंदन चंडालीया आरोग्य निरिक्षक यांनी मान्सुनपुर्व नाले सफाई सोबतच धोकादायक इमारतीचे सव्हेक्षणाची कामे सुध्दा सुरू केलेली आहेत.त्यामुळे शहरातील मोठे नाले मान्सुनपुर्व सफाई करून पावसाळ्यातील होणारे पावसाचे पाणी कुठे ही थांबणार नाही याची सुध्दा दक्षता घेण्यात येत आहे

.तसेच नागरिकांनी संध्याकाळी ५.०० वा.नंतर घरा बाहेर पडू नये.व न.प.प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे असे आहवान मुख्यअधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी शहरवासियांना केले आहे.