चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये “शिरखुरमा”च्या कार्यक्रमाचे आयोजन सोशल डिस्टन्सिंगचे व्यवस्थित पालन

0
375
ठाणेदार दीपक वानखडे यांचा उपक्रम
चांदूर रेल्वे –
ईद निमित्य हिंदू आणि मुस्लिम बांधवात भाई – चारा कायम ठेवण्यासाठी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये छोटेखानी “शिरखुरमा” च्या कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी  ठाणेदार दीपक वानखडे यांनी केले होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे व्यवस्थित पालन केल्या गेले.
सुमारे एक महिना चालत असलेल्या मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची नुकतीच सांगता झाली. यानंतर तालुक्यात रमजान ईद सुध्दा शांततेत पार पडली. ईद निमित्य भाईचारा कायम राहावा या उद्देशाने चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये “शिरखुरमा” च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील सर्वच समाजातील प्रतिष्ठित नागरिकांना बोलाविण्यात आले होते. कोरोना व्हायरसचा कहर पाहता सदर कार्यक्रम छोटेखानी स्वरूपात आटोपता घेण्यात आला. यावेळी उपस्थितांनी शिरखुरमाचा आनंद घेतला व कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पोलीसांचे आभार व्यक्त केले. यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. तसेच नागरिकांना टप्प्याटप्प्याने बोलाविण्यात आले. या नियोजनबध्द कार्यक्रमाची सर्वांनी प्रशंसा केली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पोलीस स्चेशनचे कर्मचारी पंकज शेंडे, संतोष राठोड, शेख गणी, मनोज वानखडे, अरुण भुरकाडे, महेश प्रसाद, धर्मा उगले, अमोल ढोके आदींनी अथक परिश्रम घेतले.