आ.कैलास पाटलांच्या प्रयत्नाला मोठ यश ; रसत्याठी तब्बल २ कोटी ८ लाख मंजूर !

0
1088
Google search engine
Google search engine

आ.कैलास पाटलांच्या प्रयत्नाला मोठ यश ; रसत्याठी तब्बल २ कोटी ८ लाख मंजूर !


हुकमत मुलाणी / उस्मानाबाद

उस्मानाबाद / कळंब विधानसभा मतदार संघातील विकासकामे करण्यासाठी शिवसेनेचे नुतन आमदार कैलास घाडगे – पाटिल यांनी सतत प्रयत्न करुन मतदार संघातील रसत्याच्या कामासाठी निधी मंजुर केला आहे.त्यांच्या मतदार संघातील खोंदला,व वाकडी-ईस्थळ ता कळंब रस्त्यासाठी राज्य शासना कडुन २ कोटी ८ लक्षची तरतूद केली आहे.
अनेक वर्षांपासूनचा ग्रामस्थांचा वनवास संपणार आहे.
मतदार संघातील मांजरा नदीच्या तीरावर वसलेल्या व बीड जिल्हा सिमा हद्दीवर असलेल्या खोंदला, वाकडी-ईस्थळ ता. कळंब या गावांना जोडणार्‍या रस्त्यांची मोठी दुरावस्था झालेली होती .या संदर्भात रस्त्याचा प्रश्न सोडवावा अशी स्थानीक ग्रामस्थांची अाग्रही मागणी होती.
यासंदर्भात वारंवार मागणी होत होती.काही आंदोलन झाली.मध्यंतरी या गावांनी निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला होता.वास्तविक पाहता दोन्ही गावांना जोडणार्‍या राज्यमार्ग २३६ ते खोंदला व राज्य मार्ग २३६ ते वाकडी-ईस्थळ या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्याची नव्याने बांधणी करणं गरजेचं होतं.विधानसभा निवडुकीत खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यानी खोंदला व वाकडी इस्थळ च्या ग्रामस्थाना दोन्ही गावांच्या रस्ताची कामे सहा महिन्याच्या आत मंज़ूर करण्यात येतील असे आश्वासन दिले होते.
या विषयी आमादार कैलास पाटिल यांनी फेब्रुवारी महिन्यात राज्याचे ग्राम विकास मंत्री यांना पत्र देवून, ग्राम विकास विभागाच्या रस्ते व पूल दुरूस्ती परिरक्षण कार्यक्रम अर्थात ३०५४-२४१९ या लेखाशिर्ष अंतर्गत गट ‘क’ आणि ‘ब’ मधून निधी मंजूर करावी अशी मागणी केली होती.यासाठी वारंवार पाठपुरावा करत होते .
अखेर ग्रामविकास विभागाने दोन्ही रस्ता कामांना मंजूरी दिली .यानुसार खालीलप्रमाणे रस्ता सुधारणा कामी २०१९-२० या वित्तीय वर्षाकरीता भरीव आर्थीक तरतूद मंजूर करण्यात आली आहे
1) राज्यमार्ग २३६ ते वाकडी-ईस्थळ ता. कळंब या ४ किमी लांबीचे काम – एक कोटी रूपये (ग्रामा ८८ )

2)प्रजिमा १६ ते हावरगाव खोंदला या ३/०० ते ६/४०० किमी लांबीचे काम – १ कोटी ८ लक्ष रूपये.(इजिमा ३९)

याप्रमाणे दोन्ही कामास तब्बल २ कोटी ८ लक्ष रूपयाचा निधी मंजूर झाला आहे.यामधून गत अनेक वर्षांपासून रखडलेल्या या दोन्ही रस्त्यांची सुधारणा होणार आहे.खोंदला रस्ता हा बीड जिल्ह्यास जोडणारा रस्ता आहे.केज तालुक्यातील तिर्थक्षेत्र उत्रेश्वर पिंप्री व चाकरवाडी येथे जाणार्‍या भाविकासह स्थानीक नागरिकांची या कामामुळे मोठी सोय होणार आहे.मांजरा तिरावरील वाकडी-ईस्थळ गावांचाही अनेक वर्षांपासूनचा प्रश्न यामुळे मार्गी लागणार आहे.या मंजुर झालेल्या निधीचे आमदार कैलास पाटिल यांचे परिसरातील ग्रामस्थांकडून आभिनंदन केले जात आहे.