2020 मध्ये 2016 च्या देशी दारू ची विक्री , प्रशासन अनभिज्ञ ,ठोस कार्यवाही कधी? चांदुर बाजार:-

0
4295
Google search engine
Google search engine

2020 मध्ये 2016 च्या देशी दारू ची विक्री ,
प्रशासन अनभिज्ञ ,ठोस कार्यवाही कधी?

चांदुर बाजार:-

राज्य सरकार परवाना धारक दुकान याना दारू विक्री ची परवानगी दिली आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देखील प्रशासन कडून मिळाली पण याच गोष्टीचा फायदा घेत चांदुर बाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी या ठिकाणच्या देशी दारू च्या दुकानात 2016 च्या जानेवारी महिन्यातील देशी दारूची विक्री होत असल्याची बाब समोर आली आहे.

गेल्या काही दिवसापासून सतत चर्चेत असलेल्या ब्राह्मणवाडा थडी येथील देशी दारू विक्री च्या दुकानातून चक्क ४ वर्षांपूर्वीची देशी दारूची विक्री केली जात आहे. मंगळवारी सकाळी गावातील काही मद्य शौकिनांनी गावातील दारूच्या दुकानातून देशी दारू खरेदी केली. यावेळी या दारूची बाटलीवर चार वर्षापूर्वीची दारू असल्याचे आढळून आले. या बाटलीवर छापलेल्या तारखेवरून सदर दारू जानेवारी २०१६ मध्ये पॅकिंग केले असल्याचे आढळून आले. तर काही बाटलीवर पॅकिंग तारीखच नसल्याने ही बनावट दारू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सामान्यतः कोणत्याही दारूची पॅकिंग केल्यानंतर जास्तीत जास्त सहा महिन्याच्या आत ती सहजरीत्या विक्री होते. तर राज्य उत्पादन शुल्क विभाग तर्फे प्रत्येकवेळी दारू दुकानातील शिल्लक सठयाची नोंद घेतली जाते. यात गेली दोन महिने दारू विक्री व निर्मिती बंद होती. यात काही दिवसांपूर्वी दारू विक्रीला सुरवात झाली आहे. दारू खरीदी करण्यासाठी मद्यापीनी एकाच गर्दी केल्याने दारूचा स्टोक कमी पडत आहे. यात ब्राम्हणवाडा थडी येथील दुकांदारातर्फे ४ वर्षाचा पूर्वीची दारू विक्री केली जात असल्याने ही दारू अली कोठून असा प्रश्न उपस्थित होते आहे.
गावात ४ वर्षांपूर्वी ची दारूविक्री होत असल्याची माहिती स्थानिक पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. तसेच काही वेळातच सदर दुकानदाराने सदर दारूच्या बाटल्या ची विक्री बंद केली यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलिस प्रशासन यातील कोणत्यातरी विभागाने सदर दुकानदाराला माहिती देऊन या काळाबाजार यावर पडदा टाकला असल्याचे दिसून येते.

गेल्या काही दिवसापासून ब्राह्मणवाडा थडी येथील देशी दारूचे दुकान निराळ्या चर्चेतच आहे यार यात चार वर्षांपूर्वीची देशी दारू सदर दुकानदाराने आणि कुठून याचा शोध घेणे गरजेचे आहे तर राज्य उत्पादन विभागाच्या कडे सदर सदर दुकानदाराकडे असलेल्या वर्षापूर्वीच्या दारू दुकानाची नोंद आहे काय उपस्थित होत आहे यामुळे दारू विक्री होणार्‍या काळा बाजारात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातच आपल्या जे सिद्ध होते.

चौकट क्रमांक 1
प्रशासन ची पाठराखण …………..

एकीकडे दारूचा तुटवडा असताना ४ वर्षांपूर्वीची दारू आली कुठून. तसेच ही दारू बनावट असल्याचा संशय व्यक्त केले जात असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मात्र या विक्रेत्यांची पाठराखण करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतर्फे केले जात आहे.तर ही दारू नागपूर वरून आली असल्याची चर्चा असून गावात याची विक्री अनेक दिवसांपासून सुरू असल्याची चर्चा गावात सुरू आहे.मात्र प्रशासन या बाबत अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे.

प्रतिक्रिया:-
सुबोध केडिया अधिकारी राज्य उत्पादन शुल्क विभाग अचलपूर – सदर दुकानदाराने दहा ते पंधरा दारूच्या बाटल्या विकले आहे मात्र हा माल त्याला आला कुठून याची पाहणी करण्याकरिता प्रत्यक्ष भेट दिल्यानंतरच सांगू शकतो