अधीक्षक यांच्या स्कॉड ची कार्यवाही मग स्थानिक पोलीस ची का नाही? वरिष्ठ अधिकारी घेणार का दखल ?अवैध रेती वाहतूक करताना लाखोंची कार्यवाही

Google search engine
Google search engine

अधीक्षक यांच्या स्कॉड ची कार्यवाही मग स्थानिक पोलीस ची का नाही?
वरिष्ठ अधिकारी घेणार का दखल ?अवैध रेती वाहतूक करताना लाखोंची कार्यवाही

चांदुर बाजार

                            अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढलेल्या अवैध धंदे विरोधात अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन यांनी अनेक धडाडी च्या कार्यवाही केल्या आहे.तर या कार्यवाही साठी अधीक्षक याना विशेष पथक तयार केले असून या पथक ने अनेक मोठं मोठ्या कार्यवाही केल्या आहे.त्याच्या कार्यवाही नंतर स्थानीक पोलीस स्टेशन ला पुढील कार्यवाही साठी कार्यवाही दिली जाते तर अनेक ठिकाणी या कार्यवाही मध्ये तफावत होत असताना पाहायला मिळत आहे.

                      खोलापूर पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध रेती चोरी असल्याची माहिती विशेष पथक याना मिळतातच त्यांनी सापळा रचून कार्यवाही केली.
दिनांक 28/05/2020 रोजी पोलीस स्टेशन खोलापुर हद्दीमध्ये   येथे अवैध धंदेवर कारवाई पेट्रोलींग दरम्यान ग्राम  शिंगणापूर शेतशीवार येथे पुर्णा नदी पात्रातून अवैध रेतीची चोरटी वाहतूक होत आहे अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरून  नाकाबंदी केली असता दोन आरोपी दोनबिना नंबरच्या ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये अंदाजे 2ब्रास रेतीची चोरी करून अवैध पणे वाहतूक करीत असताना दिसुन आले आमची चाहुल लागताच दोन्ही आरोपी ट्रकटर सोडुन पळुन गेले अंदाजे 2 ब्रास रेती की 12000रु व रेती वाहतुकी करिता वापरलेले दोन महीद्रा ट्रॅक्टर 2 ट्रालीसह की  100000 रु असा एकूण 10लाख 12000 रु* चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,सदर  फरार 2आरोपी विरुद्ध पोस्टे खालापूर येथे कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

            हीच कार्यवाही अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख सपोनी अजय आकरे , ,NPC अजमत सैय्यद  NPC स्वप्नील तवर PC पंकज फाटे PC गौतम कांबळे यांनी केली.

चौकट क्रमांक 1
विशेष पथक यांनी चांदुर बाजार,ब्राम्हणवाडा थडी,परतवाडा,धामणगाव रेल्वे,मोर्शी ,आसेगाव ,माहुली या पोलीस स्टेशन हद्दीत कार्यवाही केल्या त्यांच्या या कार्यवाही मुळें स्थनिक पोलीस काय करीत आहे अशा प्रश्न चर्चेत आहे.