तलाठ्यांचे रायटर कापत आहेत कोंडच्या शेतकऱ्याचे खिशे !

0
559
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद तालुक्यातील तलाठ्यांचे रायटर कापत आहेत शेतकऱ्याचे खिशे !

उस्मानाबाद / प्रतिनीधी

उस्मानाबाद तालुक्यातील तलाठी सज्जावर काम करणारे त्याचे खाजगी रायटर हे शेतकऱ्यांचे खिशे कापत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तलाठ्याच्या हाताखालील खाजगी काम करणारे रायटर हे सध्या लाँकडाऊनचा चांगला फायदा घेत आहेत. कोरोना महामारीचा संसर्ग होऊ नये म्हणून महसूल विभागाने तलाठ्यांना त्यांच्या सज्जाच्या हद्दीतील सीमेवर चेक पोस्टवर नेमणूक केल्यामुळे त्यांना तिथेच दररोज हजर राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या हाताखाली जे खाजगी रायटर आहेत ते रायटर सध्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये खुलेआम लूट करत आहेत. तलाठ्याच्या हाताखालचे रायटर झाले तलाठी आणि तलाठी झाले रायटर अशी अवस्था पाडोळी महसील मंडळाच्या हद्दितील नितळी येथील तलाठी सज्जाची सध्या अशीच गत झाली आहे. तलाठी आहेत कोण हेच कळत नाही. असाच एक प्रकार कोंड एका शेतकर्या सोबत घडला आहे. कोंड येंथील बाळासाहेब उत्तम गुरव यांची शेत जमीन त्यांच्या मुलाच्या नावाने प्रसाद गुरुव याच्या नावाने सातबार्यावर फेर करायचा होता तो आठ महिन्यापूर्वी तलाठ्याकडे खाजगी रायटर मार्फत तीन हजार रुपये देण्याचे ठरले होते ते पैसेही त्यांच्याकडे सुपूर्द केलेले आहेत परंतु आठ महिने झाले अध्यापही फेर झालेला नाही. गुरव हे सध्या शुगरचे पेशंट आहेत त्यांचे हे काम होत नसल्यामुळे त्यांना मानसीक ताण वाढला आहे. सदर प्रकरणाबाबत बाळासाहेब गुरव यांनी तलाठी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आठवड्यामध्ये फेर करतो असं बाळाहेब गुरव यांना सांगीतले.यापूर्वीही
त्यांनी असेच उत्तर दिले होते असे बाळासाहेब गुरव यांनी आमच्या प्रतिनीधीशी बोलताना सांगीतले. सदर प्रकार हा शेतकऱ्यांना लूटणाराच दिसत आहे. आठ महिने झाले तरी फेर होत नसल्यामुळे बाळासाहेब गुरव हे जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे लेखी तक्रार देणार असल्याचेही त्यांनी यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. तसेच खाली काय आहे ? रायटर काय करतात ? किती शेतकर्याकडून पैसे उकळतात हे तलाठ्यांना काडीमात्रही कळू देत नाहीत. तलाठ्याकडे पैसे पोहचत नसल्यामुळे हे शेतकऱ्यांना अडवतात की काय असाही सवाल उपस्थित केला आहे. बाळासाहेब गुरव यांचे त्यांच्या मुलाच्या नावावर जमीन न झाल्यामुळे त्यांचे आतोनात नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यावर काय संकट आहे ? याचं या रायटरांना थोडेही भान नाही. अनेक वेळा गोरगरीब शेतकऱ्याकडून पैसे उकळण्याचा सध्या धंदा जोमात सुरू आहे. असाच काहीसा प्रकार बाळासाहेब गुरव यांच्यासमोर आणखीन एक घडला आहे कोंड येथील सिद्राम मारुती निकते यांच्या बोरवेल ची नोंद सातबारावर आहे ती कमी विशेष म्हणजे हे बोअर बंद आहे. त्यासाठी ही तीन हजार रुपयांची मागणी रायटरने केली होते परंतु त्यांनी 2000 रुपये देण्याचे कबूल केले असतानाही त्यांचे काम अजूनही झाले नसल्याचेही बाळासाहेब गुरव यांनी सांगितले. या सर्व प्रकारावरून असे दिसते की सध्या कोरोनाच्या महामारी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना ही महसूल विभागाकडून खाजगी रायटर च्या माध्यमातून लूटारुपणा करत असल्याचे हे चित्र पाहायला मिळत आहे.