कडेपूर महाविद्यालयाचे प्राचार्य एस. टी.शिंगटे सेवानिवृत्त :

Google search engine
Google search engine

लो

सांगली /कडेगांव
सांगली जिल्ह्यातील कडेपुर (ता.कडेगाव) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य एस.टी. शिंगटे प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्ताने,
शिंगटे सर यांचे मुळगाव दुष्काळी माण तालुक्यातील वाघमोडे वाडी ( गोंदवले बुद्रुक ) हे असून त्यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गोंदवले बुद्रुक येथे झाले असून त्यांना शिक्षणाची प्रेरणा त्यांचे मामा कै. महादेव द-याबा वाघमोडे यांचेकडून मिळाली. पदवी व पदव्युत्तर शिक्षण इंग्रजी विषयातून घेऊन परिस्थिती गरिबीची असल्याने मिळेल ते काम केले. पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठातून ( कमवा व शिका) या योजनेतून पुर्ण केले. इंग्रजी विषयाचे प्रगल्भ ज्ञान व वक्तृत्वावर प्रभुत्व असल्याने त्यांनी आपल्या नोकरीस कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था
कोल्हापूर या संस्थेच्या माध्यमातून प्राध्यापक म्हणून सुरुवात केली. प्राध्यापक म्हणून १५ वर्षे व २५ वर्षे संस्थेच्या विविध महाविद्यालयातून प्राचार्य या पदावर नोकरी केली. अनेक विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत सरांचा मोठा वाटा आहे. आजही त्यांच्याकडे आदर्श शिक्षक, प्राचार्य म्हणून पाहिले जाते .
त्याचबरोबर त्यांचा कुटुंब परिवार मोठा असुन त्यांना एक भाऊ, पाच बहीणी आहेत. बहिणीही गरीब कुटुंबातील असल्याने सर्व बहिणींच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वत: सरांनी घेऊन स्वत: पदरमोड करून सर्व भाच्यांना शिकविले. व नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे सात भाचे शिक्षक, प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. दोन भाचे आय टी क्षेत्रात इंजिनिअर म्हणून तर एक एस. टी महामंडळकडे काम करत आहे. सर्वांना बरोबर घेऊन जात असताना त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही सहभागी होत्या.
यात सर्वांची पुण्यायी म्हणून सरांची मुलगी डॉक्टर तर मुलगा आयकर विभागात सहसंचालक*या पदावर काम करत आहे.
प्राचार्य शिंगटे सर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांना दीर्घायुष लाभो. त्यांच्या भविष्यकाळ सुखसमृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना.