उस्मानाबादेत ५ वर्षाच्या अनोळखी गणेशला महिला छेडछाड पथकाचा आधार !

0
386
Google search engine
Google search engine

उस्मानाबादेत महिला छेडछाड पथकाला सापडला ५ वर्षाचा अनोळखी गणेश !

हुकमत मुलाणी /उस्मानाबाद

उस्मानाबाद येथील बस स्टँड च्या समोर आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अंदाजे पाच वर्षे वयाचा मुलगा हा एकटा पाहून उस्मानाबाद येथील एका इंजीनीयर ने त्या मुलाला विचारपूस करण्याचा प्रयत्न केला परंतु तो मुलगा पाच वर्षांचा असल्यामुळे फक्त त्याचे गणेश आस नाव सांगतो त्यामुळे त्या इंजिनियरने महिला छेडाछाड पथकाच्या सहाय्यक पोलीस उप निरिक्षक दामोदरे मँडम यांना गस्त घालत असताना हात केला व त्यांची गाडी थांबवली व त्यांना सदर प्रकार सांगितला त्यांनी तात्काळ त्या मुलाला घेऊन आनंद नगर पोलीस ठाण्यामध्ये घेऊन गेले व त्या मुलाला आनंद नगर पोलीसांच्या ताब्यात दिले.तो मुलगा छोटा आहे त्या मुलाच्या जवळ एक लाल रंगाची फक्त शाल आहे आणि तो गणेश हा फक्त एवढंच नाव सांगतो मुलगा कोणत्या गावाचा आहे ?कुठला आहे? अजून त्याची ओळख पटलेली नाही हा मुलगा कोणाच्या ओळखीचा असेल तर त्याच्या नातेवाईकांनी उस्मानाबाद येथील आनंद नगर पोलीस ठाण्यामध्ये संपर्क साधावा असे आवाहन महिला छेडछाड पथकाच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी श्रीमती साह्यक पोलीस उप निरिक्षक दामोदरे (पानसे) हवलदार माने महिला पोलीस नाईक काशीद ,चालक अदजद पठाण होते या पथकामुळे या लहान मुलाची होणारी गैरसोय टळली अन्यथा हा छोटा गणेश आणखीन कुठ भटकत फिरला आसता देव जाणे.