सांगली जिल्ह्यातील तडसर ता. कडेगांव ग्रामपंचायतीस केंद्र शासनाचा सशक्तीकरण पुरस्कार

Google search engine
Google search engine

सांगली/ कडेगांव

सांगली जिल्ह्यातील तडसर ता.कडेगाव येथील ग्रामपंचायतीस केंद्र शासनाचा पंडीत दीनदयाळ उपाध्याय पंचायतराज सशक्तीकरण पुरस्कार जाहिर झाला आहे याबाबतचे पञ केंद्रिय पंचायत राजचे संयुक्त सचिव डॉ.संजीब पटजोशी यांनी पञाद्वारे कळवले आहे.
केंद्र शासनाचा पंडीत दीनदयाळ उपाध्याय पंचायतराज सशक्तीकरण पुरस्कारासाठी तडसर गावाने सहभाग नोंदवला होता .याची केंद्रीय पथकाने महिन्यात पहाणी केली होती.यात ग्रामसभेच्या बैठका मासिक सभा याचे नियोजन व दप्तर तपासनी गावातील विविध योजनेचे लाभार्थी यादी,महिला सभा व त्यांच्या प्रश्नांची तसेच नागरीकांच्या तक्रारीचे निरसन आदी विविध बाबी तपासण्यात आल्या होत्या यात महराष्ट्र राज्यात तडसर ग्रामपंचायत अव्वल ठरली असुन या कामगिरी बद्दल केंद्र शासनाने पंडीत दीनदयाळ उपाध्याय पंचायतराज सशक्तीकरण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे .पाच लाख रुपये व सन्मान्य चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सदर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम कोरोना विषाणू प्रार्दुभाव कमी झाल्यानंतर दिल्ली येथे राष्ट्रपती व .केंद्रीय ग्रामविकास मंत्री यांचे हस्ते करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतीस यापुर्वी महात्मा गांधी तंटामुक्त गाव,संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात तालुका स्तरीय प्रथम, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता विशेष कामगिरी ,जिल्हा स्तरीय स्व.आर.आर.पाटील आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार, तालुका स्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार, तसेच भारत सरकारचा मा.राष्ट्रपती यांचे हस्ते विशेष पुरस्कार आतापर्यत ,मिळालेले आहेत..

पुरस्कार बद्दल माजी.जि.प.सदस्य व्यंकटराव पवार यांच्यासह तडसर ग्रामस्थांनी सरपंच हणमंतराव पवार , ग्रामसेवक सचिन कांबळे यांचा सत्कार केला.यावेळी ग्रामपंचायत सदस्य पवन पवार, प्रविण पवार (दादा),जेष्ठ नागरिक उत्तम रोटे,माजी सैनिक श्री. प्रकाश जाधव, संदीप पोळ, जितेंद्र मोहीते,अमर पवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.