4 दिवसांपासुन बंद बडनेरा उद्या पी-1 व पी-2 नुसार उघडणार

0
1111
Google search engine
Google search engine

जनता कर्फ्यु पाळल्‍याबद्दल ना‍गरिक व स्‍थानिक नगरसेवक यांचे प्रशासनाने मानले आभा

अमरावती प्रतिनिधी,

शनिवार दिनांक 20 जुन,2020 रोजी सायंकाळी 5 वाजतापासुन बडनेरा भागात स्‍वयंमस्‍फुर्तीने जनता कर्फ्यु पाळण्‍यात आला. 25 तारखेपासुन पी-1 व पी-2 नुसार पुन्‍हा बाजार उघडण्‍यात येणार आहे. चारही दिवस बडनेरा वासियांनी कडक संयम पाळून जनता कर्फ्यु यशस्‍वी केला असल्‍याने येथील नागरिकांचे व स्‍थानिक नगरसेवकांचे अमरावती महानगरपालिका प्रशासन व महानगरपालिका आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी विशेष कौतुक केले आहे.

बडनेरा भागातील जुनी-नवी वस्‍तीसह अनेक भागात कोरोनाचे रुग्‍ण सापडण्‍याचे सत्रच सुरु झाल्‍याने नागरिकांनी कोरोना विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्‍यासाठी पुढाकार घेत या 4 दिवसीय कडक जनता कर्फ्युची हाक दिली होती. बडनेरा येथील नगरसेवक,  व नागरिकांच्‍या पुढाकारातून घेण्‍यात आलेल्‍या या निर्णयाला जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल व मनपा आयुक्‍तांनी विविध प्रतिबंधात्‍मक उपायोजनाही केल्‍या. संपुर्ण बडनेरा शहर निर्जंतुक करुन नागरिकांची आरोग्‍य तपासणी सुरु करण्‍यात आली. या दरम्‍यान नागरिकांनी 4 दिवस कडक जनता कर्फ्युचे पालन केले. 24 जुन हा जनता कर्फ्युचा शेवटचा दिवस असून 25 जुन पासुन बडनेरा भागातील दुकाने पुन्‍हा पी-1 व पी-2 नुसार उघडल्‍या जाणार आहे.