एकविरा स्कूल ची पुन्हा भरारी – ऑनलाईन क्लास घेण्यात ठरली अव्वल.

0
919
Google search engine
Google search engine

दर्यापुर :-

स्थानिक एकविरा स्कुल ऑफ ब्रिल्लीयांट्स, दर्यापूर ही एकमेव अशी शाळा ठरली जेथे ऑनलाईन क्लासेस पूर्णतः यशस्वी ठरली आहे.
एकविरा ही जिल्ह्यातली अशी शाळा आहे जेथे कुठल्याही मोबाईल अँप (जे हवे तितके सुरक्षित नसतात) चा उपयोग न करता स्वतःचे ऑनलाईन वेब पोर्टल बनवून लाईव्ह क्लासरूम सोबतच दिवासानुसार व्हिडिओ सेव राहतील अशी सोय केली आहे ज्या मुळे काही अडचणीमुळे जर काही विद्यार्थी क्लास करू शकले नाहीत तर ते नंतरही सेव झालेला क्लास बघू शकतात, सोबतच ऑनलाईन होमवर्क, नोटीस, सर्टिफिकेट, परीक्षा इत्यादी सुविधाही त्यात आहे ज्या टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या.

प्राचार्य तुषार चव्हाण यांच्या नियोजन बद्ध कार्यप्रणाली मध्ये अगदी सुव्यवस्थित पणे सर्व वर्ग क्रमाक्रमाने सुरू करीत आता वर्ग -५ ते १० पर्यंत सर्व शाळा ही ऑनलाईन व्हर्चुअल क्लासरुम द्वारे सुरू करण्यात आलेली आहे.

सदर ऑनलाईन क्लास चे वेळापत्रक शासन निर्णयाचे पुरेपूर पालन करून बनविलेले आहे ज्या मध्ये मुलांना शारीरिक, मानसिक त्रास व डोळ्यांवर ताण येणार नाही यावर पुरेपूर लक्ष दिल्या गेले आहे.

पालक, विद्यार्थी, शिक्षण यांनी ऑनलाईन साठी दिलेल्या प्रतिसादामुळेच व शाळेचे व्यवस्थापक डॉ. अरुणा भट्टड, डॉ.विष्णुजी भारंबे, श्री.दिलीपजी पखान, सौ.पूनम पणपालिया,श्री.अतुलजी मेघे, श्री.वैभवजी मेघे, डॉ.उत्कर्षजी भट्टड यांच्या विशेष सहकार्यामुळे हे सर्व शक्य होऊ शकले आहे ज्यासाठी प्राचार्य तुषार चव्हाण यांनी शाळेची व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक, विद्यार्थी यांचे धन्यवाद मानले.
सदर शाळेच्या मोर्शी येथे असलेल्या शाखेतही ऑनलाईन क्लासेस सुस्थितीत चालू आहेत.