…हे परंड्याचे तिन तरुण करतात अर्सेनीक अलबम -30 गोळ्याचे मोफत वाटप !

0
441
Google search engine
Google search engine



परंडा -सध्या कोरोनाच्या महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरु आहे अशातच उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा शहरातील वैद्दकिय प्रशिक्षण घेत असलेल्या तिन विद्यार्थ्यांनी रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नागरीकांना मोफत अर्सेनीक अलबम -३० गोळ्याचे स्वखर्चातून वाटप करत आहेत त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांना आधार मिळाला आहे.या बाबत अधीक माहिती अशी कि परंडा शहरातील
बी.फार्मसीचे विध्यार्थी अखलाख शेख ,उस्मान काझी ,परवेज सय्यद यांच्या मार्फत (अर्सेनीक अल्बम – ३०) होमीओपॅथीक गोळ्याचे घरपोच मोफत वाटप केले जात आहे . परंडा शहरच्या जनतेसाठी हे तिघेजण आहोरात्र मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपल्या स्वताच्या आयुष्‍याची काळजी न करता सर्व सामान्य नागरीका मध्ये जनजागृती करून कोवीड – १९ योद्धा ची भुमिका पार पाडत आहेत. त्यामुळे सर्व परंडा शहरवाशीयांकडून त्यांचे कौतुक होत आहे .