भोंदू महाराजाने पुरुष भक्तावर केला बळबरीने संभोग ; उस्मानाबाद जिल्ह्यात खळबळ !

0
1720
Google search engine
Google search engine

भोंदू महाराजाने पुरुष भक्तावरच केला बळबरीने सभोग !

उस्मानाबाद / प्रतिनीधी
उस्मानाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे.चक्क एका भोंदू महाराजाने भक्तावरच बळजबरीने अनैसर्गिक संभोग केल्याची घटना घडली आहे. याबाबत पिडित पुरुष भक्ताने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे . हि घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील इटकळ या गावात घडली. पोलिसांनी तब्बल पन्नास किलोमीटर पाटलाग करून त्या भोंदू महाजाला पकडले . महाराजाच नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.
चार दिवसापूर्वी आणदूर येथील एक भक्त महादेवाची भक्ती करण्यासाठी मंगळवार ता. ७ जुलै रोजी रात्री भोंदू महाराज याने त्या भक्ताला अंगाला तेल लाऊन मालिश करण्यास सांगितले त्या प्रमाणे सेवा करणारा भक्त ( पुरुष) या महाराजांचे अंग मालिश करू लागला त्या नंतर महाराजाची वासना बदलली व गांजा खसू मस्तावलेल्या भोंदूने भक्तांवरच चक्क बळजबरीने अनैसर्गिक संभोग केला.
वेदनेने व्याकुळ झालेला भक्त अन्याय केलेल्या या भोंदू महाराजांस शिक्षा व्हावी यासाठी इटकळ पोलीस चौकी गाठली व घडलेली हकीगत सहाय्यक फौजदार राजाभाऊ सातपुते यांना सांगीतली.
तात्काळ पोलीसांनी त्या महाराजाला ताब्यात घेतले व इटकळ आऊट पोस्ट येथे आणले पिडित भक्ताची रितसर फिर्याद घेऊन भक्तावर अनैसर्गिक संभोग केल्या प्रकरणी भा.दं.वि.कलम 377 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.