पोलिसांसमोरचं पोलीस पाटलांस मारहाण.नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीतील धनगरवाडी येथील प्रकार.

0
606
Google search engine
Google search engine

पोलिसांसमोरचं पोलीस पाटलांस मारहाण.नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीतील धनगरवाडी येथील प्रकार.

उस्मानाबाद / प्रतिनीधी

तुळजापुर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धनगरवाडीच्या पोलीस पाटलास चक्क पोलीसासमोरचं गावात काही समाज कंटकानी बेदम मारहाण केली.ही घटना सोमवारी दि.६ रोजी घडली.
विशेष म्हणजे धनगरवाडीचे पोलीस पाटील विठ्ठल हनुमंत घोडके मारहाण होत असताना नळदुर्ग पोलीस स्टेशनचे सपोफौ शेख,संबधित बीटचे हेकॉ माळाळे,पोना सोणवने व दोन होमगार्ड घटनास्थळी हजर होते.यावेळी पोलिसांनी बघ्याची भुमिका घेत मारहाण करणाऱ्यांपासुन सोडवा-सोडवी करत पोलीस जीप मधे पाटलांना बसविले व त्यांची सुटका केली.
सदर घटनेनंतर पोलीस पाटील विठ्ठल घोडके यांनी नळदुर्ग पोलिसांत तक्रार दाखल केली परंतु या घटनेची तब्बल २४ तास पोलिसांनी साधी दखल सुद्धा घेतली नाही.पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाअध्यक्ष हनुमंत देवकते,तुळजापुर तालुका उपाध्यक्ष अभिजीत गंजे-पाटील,सचिव राजकुमार ताटे,जावेद शेख,शिवानंद पाटील,किशोर वाघमारे यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी तुळजापुर दिलीप टिपरसे यांची भेट घेऊन सत्य परिस्थिती सांगितली व नळदुर्ग पोलीस पोलीस पाटलांना लोकसेवक समजत नाहीत.तरी या घटनेतील पोलीस पाटलांना योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी केली.यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी पोलीस पाटील हा लोकसेवक व्याखेत येतो त्याप्रमाणे भा.दं.वि. ३५३ नुसार गुन्हा दाखल करावा असा आदेश नळदुर्ग पोलिसांना दिला.त्याप्रमाणे तब्बल २४ तासानंतर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, धनगवाडी येथे शेतरस्ता व शिवरस्त्याचा वाद बऱ्याच दिवसांपासुन होता.याच विषयावर दि.६ रोजी गावपातळीवर या सर्व शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत कोणताही तोडगा न निघता वादावादीचे स्वरुप प्राप्त झाले.पुढे काही अनुचीत प्रकार घडु नये म्हणुन पोलीस पाटलांनी नळदुर्ग पोलीस स्टेशनला हा प्रकार कळविला.लागलीच धनगरवाडीत पोलीस पथक दाखल झाले.परंतु तु पोलिसांना का बोलावले म्हणत पोलिसांसमोर अमोल बबन घोडके,बळीराम देवराव घोडके,गणेश मनोहर दुधभाते,खंडु लिंबाजी घोडके यांनी पोलीस पाटलांस कर्तव्य बजावत असताना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.पोलीस पाटील विठ्ठल घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम ३५३,३३२,३२३,५०४,५०६ व ३४ नुसार नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल झाला.