मातृत्व हरवल्याने आभाळ कोसळले…शासनाने लगेच दुःखावर फुंकर घातले…

0
662
Google search engine
Google search engine

आ.मिटकरींच्या पुढाकाराने ४ लाखांची मदत

आकोटःसंतोष विणके

वडाळी देशमुख येथील शेतमजूर महीला संगीता सुधाकर वाडोकार शेतातुन घरी परत येतेवेळी गावाजवळील नाल्याला आलेल्या पुरात २९ जून रोजी वाहुन गेली. त्यांच्या दुर्दैवी मृत्यू पश्चात त्यांना पती व दोन मुले असून मृतक महिला अत्यंत गरीब कुटुंबातील होती.आ.मिटकरींच्या पुढाकारातुन प्रशासनाच्या वतीने त्यांना तात्काळ ४ लाख रुपयांच्या मदत निधीचा धनादेश विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी,अकोट तहसीलदार अशोक गीते,नायब तहसीलदार राजेश गुरव अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या हस्ते सोमवारी सुपूर्द करण्यात आला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शंकरराव चौधरी,डॉ निलेश वानखडे, विशाल बोरे,श्याम राऊत,सोपान कुटाळे,अमोल काळणे,निनाद मानकर,श्रीयश चौधरी यांच्यासह वडाळी देशमुख येथील लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते