सीबीएससी बोर्ड परीक्षेत भार्गवी चंडालीयाचे नेत्रदीपक यश

0
1041
Google search engine
Google search engine

 

अकोटःसंतोष विणके

सीबीएससी दिल्ली बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल काल बुधवार दि.15 रोजी घोषित झाला. केंद्रीय बोर्डाच्या या परीक्षेत शहरातील भार्गवी प्रवीण चंडालिया या विद्यार्थिनीने नेत्रदीपक यश पटकावत 95.45% टक्के गुण मिळवले.ती शहरातील विद्यांचल स्कूलच्या सीबीएससी बोर्डाच्या दहावीच्या पहील्याच बॕचची विद्यार्थिनी आहे. केंद्रीय बोर्डाच्या परीक्षेत अकोट मधील विद्यार्थिनीने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. भार्गवी ही इंग्रजीची उत्तम वक्ता असून तिने विविध स्पर्धा गाजवल्या आहेत. तिला भविष्यात आयआयटी इंजिनिअर बनायचे आहे.

तीने आपल्या यशाचे श्रेय शाळेचे अध्यक्ष,प्राचार्य, व्यवस्थापक, शिक्षक वृंद व वडील प्रवीण चंडालिया आई रीना चंडालिया यांना असल्याचे सांगितले. भार्गवीच्या या यशाने चंडालिया परिवारात आनंदाचे वातावरण असून भार्गवी ही माजी नगराध्यक्ष सुनीता चंडालिया यांची पुतणी आहे. तर तिचे काका चंदन चंडालीया आकोट नगरपालिकेत आरोग्य निरीक्षक आहेत. तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून तीच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.