उप सभापती संजय लोखंडे यांच्या पुढाकारातून येडशीत अलबम-30 गोळ्यांचे वाटप !

0
468
Google search engine
Google search engine

उप सभापती संजय लोखंडे यांच्या पुढाकारातून येडशीत अलबम-30 गोळ्यांचे वाटप !


उस्मानाबाद / प्रतिनीधी

उस्मानाबाद पंचायत समितीचे उपसभापती संजय लोखंडे यांच्या पुढाराने येडशी येथील गरजू नागरीकांना अर्सेनीक अलबम -30 या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील श्री रामलिंग बहुउद्देशीय सामाजिक संस्था, येडशी यांच्या वतीने आज येडशी गावामध्ये प्रत्येक कुटुंबाला आर्सेनिक अल्बम -30 या रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी या गोळ्या येडशीकरांसाठी नक्कीच गुणकारी ठरणार आहेत. या गोळ्याच्या वाटपासाठी रामलिंग बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय (काका) लोखंडे
उपाध्यक्ष जयंतराजे भोसले सचिव श्रीमंत नवले सर कोषाध्यक्ष सतीश (मामा) इंगळे या गोळ्या वाटपाची सुरवात उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार श्री दत्तात्रय सुरवसे साहेब, यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी उपसरपंच सुधीर सस्ते आणि संस्थेचे सर्व सभासद तसेच येडशीतील नागरीक उपस्थित होते. दरम्यान सामाजिक अंतर ठेऊन शासनाच्या नियमाचे उल्लंघन होऊ नये याची काळजी घेऊन हा गोळ्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला. उप सभापती संजय लोखंडे यांच्या पुढाकाराने
या गोळ्या वाटप केल्यामुळे येडशीकरांची रोगप्रतिकार शक्ति वाढवण्यासाठी आधार मिळाला आहे.