आस्की किड्स पब्लिक स्कूलचा 100 टक्के निकाल

189
जाहिरात

अकोटः संतोष विणके

आस्की किड्स पब्लिक स्कूल च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा मागच्या वर्षी प्रमाणे कायम असून, यावर्षी सुद्धा शाळेने 100 टक्के निकाल दिलेला आहे.
यावर्षी शाळेतून 42 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 37 विद्यार्थी हे “विषेश प्राविण्य श्रेणी”त उत्तीर्ण झाले. सार्थक अनुकूल सांगोळे हा विद्यार्थी गणित आणि विज्ञान विषयातील विशेष प्राविण्यासह, प्रथम आला. त्याला 97.80 टक्के गुण मिळालेत

.तर प्रणव सावरकर या विद्यार्थ्याने गणित विषयात 100 पैकी 100 गुण पटकावले. तसेच विज्ञान विषयात उत्कर्षां पागृत आणि क्षितिज चोरे या विद्यार्थ्यांनी 100 पैकी 99 गुण अर्जित केले. मधुरा होळंबे, माधवी पाचकोर, शांभवी असोले, मुशफेरा मुनज्जा, शामल आंधळे, हुमेरा सबा, समृद्धी कासवे, संध्या शिरसाट आदींनी प्राविण्य प्राप्त केले.

विशेष बाब म्हणजेच आस्की किड्स चा एस. एस. सी. चा निकाल हा गणित आणि विज्ञान विषयात विशेष प्राविण्याचा ठरला आहे.
विद्यार्थ्यांची प्रगती पाहता शाळेचे अध्यक्ष मिलिंदजी झाडे सचिव नितीन झाडे मुख्याध्यापिका नेहा झाडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांसह अभिनंदन केले.
मुलांनी आपल्या सफलतेचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक तथा पालकांना दिले आहे.

तालुक्यातून प्रथम आलेल्या सार्थक सह विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या अन्य सोळा विद्यार्थ्यांनी कोचिंग क्लास साठी कोठेच प्रवेश घेतला नव्हता हे विशेष.