अवैध रेती वाहतुक करणाऱ्या ट्रक मालकाला ४ लाख ८९ हजारांचा दंड – तहसिलदार यांचे आदेश

1564
जाहिरात
चांदूर रेल्वे –
अवैध रेती वाहतुक करणाऱ्या ट्रक मालकाला ४ लाख ८९ हजारांचा दंड चांदूर रेल्वेचे तहसिलदार राजेंद्र इंगळे यांनी ठोठावला आहे.
प्राप्तमाहितीनुसार, एमएच २७ बीएक्स ७८९० क्रमांकाचा मोठा टिप्पर रेती घेऊन अमरावतीकडे जात असतांना तहसिलदार राजेंद्र इंगळे यांनी मांजरखेड (कसबा) जवळ थांबविला. यामध्ये जास्त रेती दिसुन आल्याने हा टिप्पर तहसिल कार्यालयात लावण्यात आला व बांधकाम विभागामार्फत याची मोजणी केली असता एकुण रेती ९.८३ ब्रास आढळून आली. म्हणजेच परवानापेक्षा जास्त रेती होती. तसेच रॉयल्टीचा नियोजित वेळ झाल्यानंतरही वाहतुक सुरू होती. त्यामुळे या अवैध रेती वाहतुक करणाऱ्या ट्रक मालकावर ४ लाख ८९ हजार १७४ रूपयांचा दंड ठोठावल्याचे आदेश तहसिलदार राजेंद्र इंगळे यांनी काढले आहे.