खा.ओमदादा व आ.कैलासदादांच्या हस्ते कोंडमध्ये अर्सेनिक अलबम -30 गोळ्यांचे वाटप !

0
699
Google search engine
Google search engine

खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते कोंड येथे अर्सेनिक अलबम गोळ्यांचे वाटप.

सध्या कोरोना आजाराच्या रुग्णांचा उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संसर्ग होत असल्याने जिल्ह्यातील बर्याच गावात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.सध्या उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील हे दोघेही प्रत्येक गावात जाऊन कंटेनमेंट झोनमध्ये जाऊन नागरीकांची विचारपूस करुन त्यांना मार्गादर्शन करत आहेत.दरम्यान.
उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथील दि.28/०7/२०२० रोजी कोरोनाचा रुग्ण उस्मानाबादेत सिव्हिलला उपचार घेताना आढळला होता . कोंड येथे दि.3 /8/ 2020 रोजी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी भेट दिली. गावाची पाहणी केली यावेळी गावातील नागरीकांसोबत चर्चा करुन अडचणीची विचारपूस केली. व आर्सेनिक अलबम -३० या कोरोना प्रतिबंधित गोळ्यांचे वाटप केले.
सर्व गावकरी यांनी सोशल डिस्टनसिंग चे पालन करावे ,मास्कचा वापर करावा असे आवाहन केले.
यावेळी उस्मानाबाद पंचायत समीतीचे सहाय्यक गटविकास अधीकारी सुरेश तायडे , नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे , कोंड येथील शहादत मुलाणी , सिकंदर मुलाणी ,रवि पाटिल , रणधीर पाटिल , बाळासाहेब भोसले ,बापू शेटे , माजी सरपंच हरिभाऊ जाधव यांच्यासह पस्थित होते .