कोंड येथे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा धावता दौरा !

0
541
Google search engine
Google search engine

कोंड येथे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा धावता दौरा !

उस्मानाबाद / प्रतिनीधी
तुळजापूर विधानसभा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा आज कोंड येथे धावता दौरा झाला उस्मानाबाद तालुक्यातील कोंड या गावात गेल्या आठवड्यात एक covid-19 चा रुग्ण उस्मानाबाद येथे उपचार घेत असताना आढळला आहे त्यामुळे गावात तो परिसर सील करण्यात आला आहे. त्या परिसराची पाहणी करण्यासाठी व गावातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आज दि.४/८/२०२० कोंड येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्या भागात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतली व इतर माहिती घेऊन संबंधित विभागाला सूचना दिल्या. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती संजय काका लोखंडे जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिताताई कांबळे ,
उस्मानाबाद जिल्हा परिषद बांधकाम सभापती दत्ता देवळकर,उस्मानाबाद पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शंकर भांगे , कोंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैरागकर मॅडम माजी सरपंच नारायण कोरे , हरिभाऊ जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुरव, कोंड ग्रामपंचायतचे उपसरपंच अँड. रामेश्वर शेटे ,दिनेश देशमुख यांच्यासह गावातील राणासमर्थक यावेळी बर्यापैकी उपस्थित होते.