उस्मानाबादेत जमाते इस्लामी हिंदच्या कार्यालयात होणार मोहल्ला क्लिनिक सुरू !

0
526
Google search engine
Google search engine

उस्मानाबादेत जमाते इस्लामी हिंदच्या कार्यालयात होणार मोहल्ला क्लिनिक सुरू !


उस्मानाबाद / हुकमत मुलाणी


शुक्रवारी दिनांक ७ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता उस्मानाबाद येथील गालिब नगर, शिरीन काॅलनी, सुलतानपुरा भागातील नागरिकांची बैठक सोशल डिस्टन चे पालन करून जमाते इस्लामी हिंद च्या कार्यालयात संपन्न झाली. जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ मुंढे यांच्या अवाहानाला प्रतिसाद देऊन या भागात मोहल्ला क्लिनिक ची स्थापना करण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला. सर्वानुमते या प्रस्तावास अनुमती देण्यात आली.जमाते इस्लामी चे शहर अध्यक्ष श्री सजीयोदीन शेख यांनी जमात चे स्थानिक कार्यालय मोहल्ला क्लिनिक साठी मोफत देत असल्याचे जाहीर केले तसेच या वेळी डॉ के के बागवान यांनी सांगितले की कोरोनाच्या भीती मुळे व गैरसमजुती मुळे लोक आपले छोटे छोटे आजार लपवीत आहेत , त्यामुळे आजार गंभीर होउन आरोग्यास धोका निर्माण होत आहे.ही भिती दूर होण्यास या मोहल्ला क्लिनिक मुळे शक्य होईल अशी आशा व्यक्त केली. या क्लिनिक साठी विनामूल्य सेवा देण्याची तयारी त्यांनी दर्शविली.या बैठकीत जमाते इस्लामी हिंद चे जिल्हा संयोजक सिकंदर पटेल, रफ़ीक काजी,हाफ़िज निसार शकील शेख, रियाज सर,अंसारी साहेब सरदार मुजावर,साबेर हैदर अली,सय्यद अर्शद,हाफ़िज सलीम,खलील पठाण सय्यद साहेब, व इतर नागरिक उपस्थित होते.