*राज्यात शिवसेनेचे सरकार की मुघलाई :- डॉ. अनिल बोंडे – भारतीय जनता पक्षातर्फे पोलीस प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध*

0
1234
Google search engine
Google search engine

मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते दि. ०५ ऑगस्ट २०२० रोजी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या भव्य मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. हा आनंद व्यक्त करतांना प्रत्येकांनी आपल्या घरावर भगवे झेंडे, लाडू वाटप, रांगोळी, रोषणाई इत्यादी कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून आयोजित केले होते. तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल कार्यकर्त्यांना गावोगावी हुडकून त्यांना आगाऊ नोटीस देण्यात आल्या. तसेच मंदिरामध्ये पुजाऱ्याने केलेल्या व्ययक्तिक पूजन व आरतीला सुद्धा पोलिसांनी मज्जाव केला. घरावर भगवे ध्वज लावण्यास अनेक पोलिसांनी अटकाव केला. आनंदोत्सव साजरा करित असतांना वयक्तिक कार्यकर्ता मास्क बांधून लाडू वाटप करतांना त्याना सुद्धा अटकाव करण्यात आला. एवढेच नाही तर ‘जय श्रीराम’ म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ‘जय श्रीराम’ म्हटल्यास अटक करण्यात येईल असेही धमकवण्यात आले असे shri Anil जी Bonde यांचा तर्फे सांगण्यात आले आहे व निवेदन देण्यात आले
प्रभू श्रीरामचंद्राचा जन्मोत्सव ही देशासाठी अभिमानाची बाब असली तरी महाराष्ट्रामध्ये व विशेषतः अमरावती जिल्ह्यामध्ये पोलिसांनी दडपशाहीने बंदी घातली होती. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री असतांना समस्त हिंदु बांधवावर ही दडपशाही अमरावतीमध्ये करण्यात आली. या दडपशाहीचा जिल्हाधिकारी कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी तर्फे तीव्र निषेध केला . यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष सौ. निवेदिताताई चौधरी, सरचिटणीस प्रशांत शेगोकार, राजेश पाठक, श्री. मावस्कर, विकास इंगोले, राजुभाऊ चिरडे, ललित समदूरकर, सत्यजित राठोड, मिलिंद बाम्बल, शुभम तीखिले निखील भटकर उपस्थित होते.