लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त बार्टीचा आॕनलाइन प्रबोधन सप्ताह कार्यक्रम संपन्न..

0
725
Google search engine
Google search engine

.आकोटः प्रतिनिधी

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मा.धनंजय मुंडे मंत्री,सामाजिक न्याय व विशेष सहा.विभाग,मा.विश्वजित कदम,

राज्यमंत्री(सा.न्या.व.वि.स.वि),मा.पराग जैन – नैनुटीया (भाप्रसे) प्रधान सचिव(सा.न्या. व.वि.स.वि),मा.कैलास कणसे महासंचालक बार्टी,यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच श्रीमती प्रज्ञा वाघमारे मुख्य प्रकल्प संचालक यांच्या संकल्पनेतून,जिल्हा प्रकल्प अधिकारी विजय बेदरकर यांच्या स्थानिकमार्गदर्शनात समतादूत प्रकल्पाच्या संयोजनात लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाइन प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यामध्ये अकोला जिल्हा समतादूत टीम च्या मुख्य संयोजनात अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांचे जिवनकार्य,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,संविधान जागृती,संत महापुरुष यांचे विचार अशा विषयावर आधारित जनजागृतीपर मार्गदर्शक ऑनलाईन प्रबोधन कार्यक्रम,व्याख्याने,चर्चासत्र संपन्न झाली.त्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत वक्ते,साहित्यिक,नवनियुक्त उच्चपदस्थ अधिकारी,कवी,लेखक,पत्रकार व प्रबोधनकार मंडळी यांनी आपले विचार प्रगट केले

.या कार्यक्रमात अकोला जिल्हातील प्रत्येक तालुक्यातील समतादूत यांनी आपल्या तालुका कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांना लाभार्थ्यांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी सोशल मीडिया च्या माध्यमातून या ऑनलाइन उपक्रमाचा प्रचार प्रसार करून आपल्या मुख्य संयोजनात हे कार्यक्रम आयोजित केले होते.या ऑनलाइन प्रबोधन कार्यक्रमाचा समारोप दिनांक ०५/ऑगस्ट/२०२० ला संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून दैनिक सकाळ चे पत्रकार संतोष चक्रनारायन हे लाभले होते तसेच कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून महादर्पण चे रिपोर्टर किरण डोंगरे व समतादूत मनेश चोटमल तसेच प्रज्ञा खंडारे हे लाभले होते

.यावेळी लोकगायक सौ.कविता विनोद सिरसाट यांनी आपल्या आवाजातून भीमगीत लोकशाहीर अण्णाभाऊ यांच्या जीवनावर आधारित लोकगीते व भीमगिते यावेळी सादर केली.कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक मंडळींनी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी माहिती विषद करून त्यांच्या विचाराची समाजाला खऱ्या अर्थाने गरज असल्याचे प्रतिपादन केले तसेच बार्टी समतादूत टीम सदस्यांनी यावेळी बार्टीचे विविध उपक्रम,सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती दिली.या ऑनलाइन प्रबोधन कार्यक्रमाला जिल्हातील ग्रामसेवक,सरपंच,विद्यार्थी तसेच इतर
लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत लाभ घेतला.सप्ताहात एकूण २८ ऑनलाइन कार्यक्रम संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समतादूत रविना सोनकुसरे,ऍड.वैशाली गवई अकोला,समता तायडे पातूर,शुभांगी लव्हाळे तेल्हारा,स्मिता राऊत बाळापूर,उपेंद्र गावंडे,विनोद सिरसाट बार्शीटाकळी,बालाजी गिरी अकोट यांनी परिश्रम घेतले.