पत्रकारांवर हात उचलणा-याची गय केली जाणार नाही – हुकमत मुलाणी !

0
1504
Google search engine
Google search engine

पत्रकारांवर हात उचलणा-याची गय केली जाणार नाही – हुकमत मुलाणी !

उस्मानाबद – सध्या कोरोनाच्या संकटात सापडलेल्या अनेक नागरीकांच्या समस्या समाजापुढे आणण्याचे काम हे पत्रकार करत आहेत. परंतु काही ठिकाणी विनाकारण पत्रकारांना मारहाण केली जात आहे. त्यामुळे पत्रकारांना नाहक अन्याय सहन करावा लागत आहे. सध्या महाराष्ट्रात पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ ही संघटना अग्रेसर कार्य करीत आहे. या संघटनेच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यातील संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनंत साखरे ,जिल्हा उपाध्यक्ष विकास उबाळे यांच्यासोबत जिल्ह्यातील सर्व पदाधीकार्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे यापुढे जर कोणी पत्रकारावर हात उचलला तर त्याची गय केली जाणार नाही त्याला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ संबंधीत विभागाला निवेदन देऊन रितसर रसत्यावर उतरुन तिव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे व मराठवडा कार्याध्यक्ष हुकमत मुलाणी यांनी दिली आहे.