अकोली.जहाँ.येथे फवारणी तंत्रज्ञानाबाबत कृषी प्रात्यक्षिक.

0
1442
Google search engine
Google search engine

आकोटः ता.प्रतिनीधी

आदित्य गजानन धर्मे या कृषि शाखेच्या विद्यार्थ्यांने ग्रामीण कृषि कार्यानुभव या उपक्रमा अंतर्गत अकोली जहाँ.येथे शेतकऱ्यांना फवारणीच्या सुयोग्य तंत्रज्ञानाबाबत कृषी प्रात्यक्षिक दिले. रासायनिक फवारणी मुळे अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे त्यामुळे फवारणी घेताना योग्य काळजी कशी घ्यावी याबाबत हे प्रात्यक्षिक देण्यात आले. आदीत्य श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला अंधारे येथील अंतिम वर्षाला आहे

.यात फवारणी करते वेळी कोणती काळजी घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन केले व फवारणी करतेवेळेस घेण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच फवारणी करतेवेळी संरक्षक कपडे घालावे नाकावरील मास्क घालावा,चष्मा वापरावा औषध अंगावर उडणार नाही याची काळजी घ्यावी शक्‍यतो हवेचा प्रवाह मंद असताना फवारणी करावी जखमी व्यक्तीने फवारणी करू नये फवारणी केल्यानंतर कपड्यांची योग्य विल्हेवाट लावावी आधी खबरदारीबाबत अवगत करण्यात आले.

या प्रबोधन कार्यानुभव साठी त्याला महाविद्यालयाचे प्राचार्य राम खरडे व कार्यक्रम अधिकारी प्रा.सुरज चांदुरकर प्रा. वैभव इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले प्रात्यक्षिक दरम्यान शेतीनिष्ठ शेतकरी गजानन धर्मे ग्रा. स. देवानंद गोठवाड शेतकरी अरविंद धर्मे, गजानन आकोटकर, स्वप्नील खन्नाडे, सचिन आकोट कर, साहेबराव आकोटकर, कैलास आकोटकर, संजय धर्मे, आदींची उपस्थिती होती.