*त्या अंध व अपंग इंगळे परिवाराला डॉ. अनिल बोंडे यांचा मदतीचा हाथ*

0
896
Google search engine
Google search engine

 

अमरावती :-

गरीबीचे जीवन जगत असतांना अचानक नियतीचा फेरा पलटला अन वरुड तालुक्यातील शहापूर येथील साहेबराव इंगळे परिवार हातावर कमावून कुटुंबांचे पालनपोषण करीत २० वर्षीय सीता, दोन लहान मुले व पत्नी सोबत राहतात पत्नीला डोळ्याचा आजार असल्याने उपचारादरम्यान ती आंधळी झाली. चारही मुले जन्मतच अपंग त्यात एका मुलीचे लग्न झाले व एक मुलगा मतीमंद सुद्धा आहे. ह्या परीवाराचे पालनपोषणची जबाबदारी पूर्णत साहेबराव ह्यांच्यावर आली. परंतु एका अपघातात त्याना सुधा कायमचे अपंगत्व आले. हि माहिती मिळताच माजी कृषिमंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे ह्यांनी शहापूर गाठले. त्यांना मदतीचा हाथ देऊन कुटुंबाला धीर दिला.
चार मातीच्या भिंती, त्याच्यावर एक कागद झोपडीत पूर्ण ओले बसायला जागा नाही, एक बाई व तिचे ३ मुले आंधळे पती अपंग संसार चालणार तरी कसा? २ मुले व बाई भिक मांगून आपले व परीवाराचे पोट भरते, एवढी विदारक गरीब परिस्थिती एकूण मन हेलावून जाते. ह्यातच ह्या कुटुंबाला मदतीचा हाथ देण्यासाठी माजी कृषिमंत्री व भाजपा किसान मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी पुढाकार घेतला. कुटुंबाला मदतीचा हाथ म्हणून सर्व कुटुंबाला कपडे, अंध बाई व त्यांच्या ३ मुलांना चालण्यासाठी सोयीस्कर व्हावे यासाठी सेन्सर काठी दिली. व भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष हितेश तडस व शहराध्यक्ष नितीन गुर्जर यांच्यावर त्या परीवारातील अपंग व निराधारची केस करून त्यांना लाभ मिळवून देण्याची जबाबदारी देण्यात आली. यावेळी भाजपा युवा मोर्चा ग्रामीण चे तालुकाध्यक्ष हितेश तडस व वरुड भाजयुमो चे शहराध्यक्ष नितीन गुर्जर यशपाल राउत , दीपक बिजवे, राज नागले, सचिन धोंडे, अपूर्व आंडे विशाल बघेले, शुभम मोरे सुनिता उईके, शुभम उईके, मंगला बिजवे, दुर्गा भटकर बेबी चोरे रीना मोरे सुनिता उईके रेखा हरले, विनय भटकर आकाश मसराम व सुमन वानखडे उपस्थित होते.