यावर्षी तोरणाखालून निघणार नाही नंदीबैल, प्रशासन ला सहकार्य करण्याचे आव्हान कोरोना मुळे प्रशासन दक्ष, शशिकांत निचत:

0
788
Google search engine
Google search engine

यावर्षी तोरणाखालून निघणार नाही नंदीबैल, प्रशासन ला सहकार्य करण्याचे आव्हान

कोरोना मुळे प्रशासन दक्ष,

शशिकांत निचत:-

                     पावसाळा सुरू झाला, पेरण्या झाल्या की शेतकरी राजाची लगबग सुरू होते ती आपल्या लाडक्या बैलाचा सण साजरा करण्याची. मात्र यावर्षी कोरोना महामारीमुळे सर्व सण हे कायदायच्या चौकटीत आले आहे.त्याचा परिणाम हा पोळ्यावर  झाला आहे.

बैलांचा सण बेंदूर आज साजरा होणार आहे. हा हिंदू धर्मातील सण दरवर्षी आषाढ पौर्णिमेला साजरा केला जातो बेंदूर सण बेंदूर सणाला बैलांचा सण म्हणून ओळखलं जातं.यादिवशी बैलांना न्हावू-माखू घालून त्यांना सजवलं जातं आणि पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो
वटपौर्णिमा साजरी झाली की लगबग सुरू होते बेंदूर सणाची. अमरावती जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात  बैलांचा  सण साजरा केला जातो. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये याच सणाला ‘पोळा’ (Pola) असं म्हणतात. बेंदूर आणि पोळा हा सण साजरा करण्याची पद्धत एकच असली तरी दिवस वेगळे आहेत. साधारण आषाढ महिन्यातील पहिल्या पौर्णिमेदरम्यान शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. त्यामुळे हा बैलांचा सण असून या दिवशी सकाळपासून गाय-बैलांना न्हाऊ माखू घातलं जातं. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घालून पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला गेला. जातो. याशिवाय घरात मातीचे दोन बैल आणून त्यांची हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून त्यांची मनोभावे पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो.

बैलांची केली जाते खांदेमळणी

बेंदूर सणाच्या दिवशी बैलांची खांदेमळणी केली जाते. खांदेमळणी ही सुद्धा एक विशेष असते. कारण यावेळी बैलांचे खांदे गरम पाण्यानं धुतले जातात. म्हणजेच बैलांना गरम पाण्यानं शेक दिला जातो. त्यानंतर बैलांच्या खांद्यांना हळद लावली जाते.बैलांच्या वशींडापासूनचा पुढील भाग आणि मानेच्या वरचा भाग म्हणजे खांदा. बैलाला बेंदूरच्या दिवशी खांदा शेकल्यानंतर हळद लावतात. त्यावेळी गोठ्यात असलेल्या सर्व गायी, म्हैस आणि जनावरांना अनेक जण रंगवतात आणि खूप चांगली वागणूक देतात.

यानंतर बैलाला या दिवशी सर्व कामातून सुट्टी दिली जाते. बैलांना आणि इतर जनावरांना छान हिरवा चारा दिला जातो. पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. दुपारनंतर बैलाला सजवतात. त्यांच्या शिंगांणा छान रंग दिला जातो. अंगावर झूल घालतात. बेगड्या चिटकवल्या जातात. डोक्याला बाशिंग आणि गळ्यात घुंगरांची माळ घातली जाते. यादिवशी नवीन वेसण, म्होरकी, कंडा बैलांना घातला जातो. बैलांच्या अंगावर विविध रंगांचे ठसे उमटवले जातात. त्यानंतर बैलांची पूजा करून त्यांची मिरवणूक निघते. ढोल-ताशांच्या गजरामध्ये बैलांची मिरवणूक काढली जाते.

दरम्यान, यंदा 18 ऑगस्ट या तारखेला आषाढ पौर्णिमा येतेय. यादिवशी बेंदूर सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी बेंदूरसाठीची तयारी केलेली आहे. पण यंदा कोरोना व्हायरसच्या संकटामध्ये बेंदूर सण घरच्याघरी साजरा केला जाईल. बैलांची मिरवणूक काढली जाणार नाही.

तान्हा पोळा ला विशेष महत्त्व

मोठ्या बैलाची पूजा ज्या दिवशी केली जाते त्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा म्हणजे लहान मूल मातीच्या बैल घेऊन प्रत्येक घरी जाऊन त्याच्या पूजा केली जाते.त्याला तान्हा पोळा म्हटले जाते तर बैलाची पूजा केल्यानंतर ओवाळणी करून काही पैसे हे लहान मुलांना दिले जाते.