उस्मानाबादेत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी खलील पठाण यांचे नाव आघाडीवर !

0
689
Google search engine
Google search engine

उस्मानाबादेत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी खलील पठाण यांचे नाव आघाडीवर !


उस्मानाबाद / प्रतिनीधी

उस्मानाबाद – राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तारेक सलीम मिर्झा यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक प्रदेश सचिवपदी निवड झाल्यामुळे सध्या उस्मानाबादचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष पद हे रिक्त झाले आहे.या पदासाठी बर्याच जणांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे पण सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष पदासाठी खलील ताजोदीन पठाण यांच्याच नावाची चर्चा जोरात सुरु आहे. पठाण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कट्टर समर्थक आहेत ते 25 वर्षापासून मा. शरद पवार साहेबाचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी आत्तापर्यंत उस्मानाबाद युवक शहर उप अध्यक्ष, युवक जिल्हा संघटक.व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उस्मानाबाद जिल्हा सचिव पदाचा पदभार घेऊन राष्ट्रवादी पक्ष वाढिसाठी एक निष्ठ काय॔ केले आहे.
1994 ते 2002 पर्यंत एन एस यु आय ते युवक शहर उप अध्यक्ष , युवक जिल्हा संघटक.व 20-03 – 2019 ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उस्मानाबाद जिल्हा सचिव म्हणून काम केल्यामुळे खलील पठाण यांना अल्पसंख्यांक समाजासाठी काम करण्याचा दांडगा अनुभव आहे.खलील पठाण यांचे राष्ट्रवादी पार्टीमध्ये चांगलेच राजकीय वजन आहे. त्यांनी आजपर्यत बरेच सामाजीक उप उपक्रम राबवले आहेत.कोरोना विषणू रोखण्यासाठी त्यांनी समाजातील राष्ट्रवादीच्या पुढार्यासोबत मोहल्ला क्लीनिक उभारणीसाठी मोलाचे सहकार्य केले आहे.तसेच गेल्या चार महिन्यापासून जिवाची परवा न करता कटेंनमेंट झोनमध्ये जाऊन गरजु लोकांना मित्रमंडळींच्या सहकार्याने धान्याचे किटही वाटप केले आहे.त्यामुळे सध्या रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदासठी खलील पठाण यांच्या नावाची चर्चा आघाडिवर होत असल्याचे दिसत आहे.

भावी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष (राष्ट्रवादी )