नळदुर्ग येथील रामतीर्थ येथे वृक्षारोपण व छायाचित्रकारांचा सत्कार !

0
457
Google search engine
Google search engine

जागतिक छायाचित्र दिना निमित्त नळदुर्ग येथील श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे वृक्षारोपण व छायाचित्रकारांचा सत्कार

तुळजापूर तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनचा उपक्रम

उस्मानाबाद / प्रतिनीधी

जागतीक छायाचित्र दिनाचे औचित्य साधुन तुळजापूर तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने बुधवार (दि.१९)रोजी नळदुर्ग येथील श्रीक्षेत्र रामतीर्थ देवस्थान परीसरात वृक्षारोपण करून छायाचित्रकारांचा सत्कार नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत यांच्या हस्ते करण्यात आला.
*यावेळी जेष्ठ फोटोग्राफर अशोक मायाचारी,कोर कमेटी सदस्य शिवानंद खुने, महेबूब शेख,संजय कुभार,तुळजापूर तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष निजाम शेख,सचिव शिवानंद नाटेकरी,कार्यध्यक्ष अनिल जाधव,कार्यवाहक अलीम शेख, नितीन गायकवाड,सचिन राठोड,किरण कांबळे,गणेश जवळगे,खंडू टकले,सलीम शेख,रामतिर्थ गावचे सरपंच बालाजी राठोड, यांच्यासह फोटोग्राफर उपस्थित होते,या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार निजाम शेख यांनी मानले