अकोटमध्ये विघ्नहर्ता श्रीगणेशाचे हर्षोल्हासात आगमन

0
1072
Google search engine
Google search engine

अकोटःसंतोष विणके

ना गुलाल..ना वाद्य.. तरी पन उत्साह अन आनंद

कोरोना महामारी प्रादुर्भावच्या सावटाखाली विघ्नहर्ता श्रींगणेशाचे शहर व तालुक्यात हर्षोल्हासात आगमन झाले. या वर्षी अत्यंत साध्या पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत असला तरी घरोघरी होणाऱ्या बाप्पांच्या स्वागतामध्ये कुठेच कमी नव्हती. कोरोना काळातही संकट निवारक आद्य दैवत गणपती बाप्पाची ठीकठीकाणी मनोभावे स्थापना करण्यात आली.दरम्यान यावर्षी गणेशोत्सवाला नियम व अटी लागू असल्याने सार्वजनिक मंडळांनी चार फुटांच्या आतील मूर्तींची स्थापना केली तर घरगुती गणेश स्थापनेसाठी पन लहान मूर्तीनांच पसंती दिसून आली. पुढचे दहा दिवस शहरवासी गणरायाची मनोभावे पूजा करून कोरोना संकट लवकर जाऊन,आरोग्य भरभराटीसह सुख शांती मिळावी म्हणून गणरायाच्या चरणी साकडे घालणार आहेत.

सोशल डीस्टनिंगचा फज्जा…मुर्ती विक्रीस्थळी चिखलाचं साम्राज्य…

गणेशमुर्ती घेण्यासाठी स्थानिक कबुतरी मैदानातील मुर्ती विक्रीचे दुकाने दरवर्षी प्रमाणे थाटण्यात आली होती.मात्र कोरोनाचे सावट असतांनाही बाजारात गर्दीची झुंबड उडालेली होती.या गर्दीमुळं सोशल डीस्टनिंगचा फज्जा उडाला विशेष म्हणजे विक्रीस्थळावरील दुकांनांमध्ये योग्य अंतराच्या अभावाने एकच झुंबड होत होती.तर पावसामुळं नागरीक चिखलातुन कसरत करत वाट काढत होते.