हिवरखेड जिल्हा परिषद सर्कलमध्ये आमदार आपल्या दारी – जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी देवेंद्र भुयार यांची धडपड !

0
994
Google search engine
Google search engine

आमदार प्रत्येक गावात जाऊन जाणून घेत आहे नागरिकांच्या समस्या ! 

मोर्शी तालुका प्रतिनिधी /
मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी तालुक्यातील दापोरी, घोडदेव, सालबर्डी ,तरोडा , धानोरा, मानीमपूर, उमरखेड, बेलोना, डोंगरयावली, पाळा, भाईपुर, मायवाडी या गावांना भेट देऊन तेथील विविध समस्यांबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली. या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्याची पाहणी करण्याकरिता  आमदार देवेंद्र भुयार यांना पायपीट करावी लागली, आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रत्येक गावात जाऊन भेट देऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
शासकीय योजनांचा लाभ मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला व्हावा यासाठी आमदार देवेंद्र भुयार प्रत्येक गाव वस्तीत जाऊन भेट देऊन तेथील नागरिकांशी चर्चा करीत समस्या जाणून घेत आहेत. यादरम्यान नागरिकांनी सुचवलेल्या विकास कामांची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. त्यानुसार शनिवारी त्यांनी मोर्शी तालुक्यातील हिवरखेड जिल्हा परिषद सर्कलमधील गावांचा दौरा करून जनतेचा समस्या जाणून घेतल्या. या ठिकाणी प्रत्येक गावातील शेतातील पांदण रस्ते, नदी नाल्यांवरील पूल,  पिण्याच्या पाण्याची, दळणवळणासाठी आवश्यक असलेल्या रस्त्याची, व्यायामशाळा साहित्य, व व्यामशाळा बांधकाम करणे, हायमास्ट लाईट, सोलर लाईट, शिक्षण व्यवस्था, आरोग्य सुविधा, यासह विविध विकास कामांची पाहणी केली. कोरोना संकटकाळामध्ये जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन तात्काळ उपाय योजना करण्यासाठी आपल्या गावामध्ये स्वतः आमदार आल्याने या गावातील गावकऱ्यांनी आमदारांशी बिनधास्तपणे चर्चा करीत दैनंदिन जीवन जगत असताना उद्भवणाऱ्या समस्याचा पाढा वाचला.
यावर आमदार देवेंद्र भुयार यांनी ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्या जाणून घेतल्या व संबंधित अधिकारींना तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले, व शासनाच्या सर्व योजना आपल्या पर्यंत पोचवू असे सांगितले. यादरम्यान आरोग्य , शिक्षण, शेती यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्यात आल्या यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रकाश विघे, उमेश गुडधे, जिल्हा परिषद सदस्य अनिल डबरासे, जिल्हा शिक्षक बँकेचे अध्यक्ष गोकुलदास राऊत, हिवरखेड येथील सरपंच विजय पाचारे, मंगेश कडू,  स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष हितेश साबळे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, विनोद ठोके, सुनील केचे, समीर विघे, निखिल फलके, यांच्यासह आदी उपस्थित होते.