*खोडकिड्याने केले सोयाबीन पिकाचे नुकसान – माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली पिकाची पाहणी*

0
730
Google search engine
Google search engine

 

*प्रतिनिधी:-*
शेतकऱ्यांवर वारंवार संकटाचा सामना करावा लागत आहे. आता मोर्शी तालुक्यात सोयाबीन पिकावर दुसरं संकट आले आहे. आधी सोयाबीन पीक उगवलं नाही आणि जे उगवलं त्याच्यावर खोडकिड्याने मारा केला आहे. आज मोर्शी तालुक्यातील लाडकी या गावात माजी कृषिमंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी ह्या सोयाबीन पिकाची पाहणी केली व ह्या संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी सुद्धा राज्य सरकार ला केली आहे.
अमरावती विभागात सोयाबीन न उगवल्याच्या 30 हजार च्यावर तक्रारी दाखल झाल्या होत्या.परंतु त्यातही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यातच आता ह्याच सोयाबीन पिकाची खोडकीड ह्या नावाच्या किड्याने पिकांचे नुकसान केले आहे. हा किडा मुळापासून जाणार रस रोखून घेतो आणि पिकांना शेंगा येत नाही व पिक हे पिवळे पडतात व त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे ह्यात कृषिविभागांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे व ह्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीने मदत घ्यावी अशी मागणी माजी कृषिमंत्री व भाजपा किसान मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष डॉ अनिल बोंडे यांनी केली आहे.