पंकजाताई मुंडे पुन्हा एकदा पहिल्याच झंझावाताने राजकारणात उतरण्याच्या तयारीत!

0
902
Google search engine
Google search engine

मुंबई |  गेल्या काही दिवसांपासून सक्रीय राजकारणापासून लांब असलेल्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा नव्याने राजकीय इनिंग सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. परदेशवारी झाल्यावर परत आल्यावर, कोरोना संकट दूर झाल्यावर, जनजीवन सुरळीत झाल्यावर पुन्हा एकदा पूर्वीच्या झंझावाताप्रमाणे, ताकदीने समाजाच्या सेवेसाठी उतरण्याचा निश्चय गणपती पुढे केल्याची भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.एक फेसबुक पोस्ट द्वारे बऱ्याच कालावधी नंतर पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मुलाच्या उच्च शिक्षणासाठी परदेशात काही दिवस जावे लागणार आहे. तेव्हा त्यानंतर नव्याने सुरुवात करणार असल्याची भावना पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांपुढे व्यक्त केली आहे.

“सध्या कोरोनाच्या पाश्वभूमिवर गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. बॅंड बाजाचे आवाज अपेक्षित आहेत. मात्र, सगळेजण नियंमांचे पालन करताना दिसत आहेत. मी देखील अनेक दिवस लॉकडाऊनमूळे घरात आहे.१-२ वेळा जिल्ह्यामध्ये जाण्यातच प्रयत्न केला. मात्र, १४ दिवस कोणाला भेटायचं नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले त्यामूळे त्याचा काही उपयोग नसल्याचे मी घरातच थांबले. माझा मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार आहे. त्याला सोडण्यासाठी मला परदेशात जावे लागणार आहे. त्यामूळे १४ दिवस क्वॉरंटाईन राहणे गरजेचे आहे”.
“मुलाला स्थिरस्थावर केल्यानंतर, कोरोना स्थिर स्थावर झाला की पुन्हा पहिल्याच झंझावाताने आणि पहिल्याच ताकदीने समाजाच्या सेवेसाठी उतरण्याचा निश्चय गणपती पुढे केला आहे. मनातून समाजातील सेवा क्षणभरही दुर जात नाही. मात्र, मी एक स्त्री आहे, माता आहे. त्यामूळे मुलगा परदेशात जात असल्याकारणाने त्याच्या सोबत जास्तीत जास्त क्षण घालवण्याचा प्रयत्न करत आहे”, असे त्यांनी या व्हिडिओतून म्हटले आहे. त्यामूळे लवकरच पंकजा मुंडे राजकारणात याव्या आणि आल्यानंतर काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.