स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शेगाव नगरपरिषद ला 15 कोटी चा पुरस्कार

0
1289
Google search engine
Google search engine

 

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शेगाव नगरपरिषद ला 15 कोटी चा पुरस्कार

भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा 2014च्या निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमतत  सत्तेत आले त्याच वेळी त्यांनी ठामपणे भारताला स्वच्छ  आणी सुंदर करण्याचा विळा हाती घेतला होता. त्याकरिता त्यांनी अनेक सेलिब्रिटीं,खेळाडु ,तारक ,तारीका  ,समासेवक  अधीकारी  सोबत घेऊन संपूर्ण भारतात स्वच्छता मोहीम राबविली आणि स्वतः या मोहिमेला दरवेळेस सहभागी राहिले काळानुसार मोहिम मध्ये थोडे बदल झाले आणि भारतातील सर्वात स्वच्छ असलेल्या शहरांना केंद्र शासन विकासाकरिता आणि स्वच्छते करिता पुरस्कार देणार या घोषणा पंतप्रधानांच्या ऑफिस कडुन (PMO ) करण्यात आल्या त्यातलाच एक भाग म्हणून भारतामध्ये 100 नगर परिषदांना स्वच्छतेचा पुरस्कार मिळालेला आहे त्यात नेहमी चर्चेत असणारी संत नगरी आणि संत नगरीची स्वच्छ नगरपरिषद शेगाव यांचा समावेश सुद्धा आहे  त्यामुळे शेगावला सुद्धा स्वच्छतेच्या बाबतीत पंधरा कोटी रुपयांचे अनुदान बक्षीस स्वरुपात   मिळले  याकरिता शेगावच्या नगराध्यक्ष सौ. शकुंतलाताई बुच  विद्यमान आमदार संजय कुटे  यांनी अतोनात प्रयत्न केलेत परंतु या पुरस्कारांमध्ये माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर आणि माजी मुख्याधिकारी अतुल पंत त्यांचासुद्धा सिंहाचा वाटा आहे शिवाय संत नगरीतील जनतेने स्वतःहून पुढे येऊन संपूर्ण गावांमध्ये स्वच्छता राबविली त्याचेच फळ म्हणून आज भारतातील शंभर नगरपरिषदांमध्ये संतनगरीच  नाव झळकलेल आहे शिवाय दिल्ली दरबारात सुद्धा आता संतनगरी ची स्वच्छ नोंद झालेली आहे. ही खुप   अभिमानाची  बाब आहे.